शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

शिक्षण विभागाच्या सर्व्हेक्षणामुळे पालकामंध्ये संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 05:01 IST

कोरोनामुळे यावर्षी प्रथमच उन्हाळ्याच्या सुट्या परीक्षा न घेताच सुरू झाल्या. सुटीचा कालावधी वाढत असल्यामुळे शिक्षण विभागाने ‘होम फार्म स्टडी’ योजना सुरु करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. या प्रयत्नाला ग्रामीण भागातील पालक किती सहकार्य करतात, ते भविष्यात कळणारच आहे. मात्र सध्या शिक्षण विभागाने केंद्र प्रमुख्यांच्या माध्यमातून मुख्याध्यापकांना पालकांकडून माहिती गोळा करण्याच्या सुचना दिल्या असून त्याचा रिपोर्ट तत्काळ कळविण्याचे आदेश दिले आहे.

ठळक मुद्देशिक्षकांना मनस्ताप : रेडिओ, टीव्ही, मोबाईल, होम लर्निंग संदर्भात विचारणा सूरू

साईनाथ कुचनकार।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनामुळे सर्व विस्कळीत झाले आहे. असे असतानाच जिल्हा परिषद शिक्षण विभागाने ग्रामीण भागात आता नवीन सर्व्हेक्षण सुरु केले आहे. या सर्व्हेक्षणामुळे पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून कोरोनाच्या महामारीमध्ये शासनस्तरावर आपल्याला काही तरी मिळतील, अशी अपेक्षा पालकांमध्ये व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे पालकांच्या प्रश्नांना उत्तर देताना शिक्षकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.कोरोनामुळे यावर्षी प्रथमच उन्हाळ्याच्या सुट्या परीक्षा न घेताच सुरू झाल्या. सुटीचा कालावधी वाढत असल्यामुळे शिक्षण विभागाने ‘होम फार्म स्टडी’ योजना सुरु करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. या प्रयत्नाला ग्रामीण भागातील पालक किती सहकार्य करतात, ते भविष्यात कळणारच आहे. मात्र सध्या शिक्षण विभागाने केंद्र प्रमुख्यांच्या माध्यमातून मुख्याध्यापकांना पालकांकडून माहिती गोळा करण्याच्या सुचना दिल्या असून त्याचा रिपोर्ट तत्काळ कळविण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे सर्व शिक्षक सध्या पालकांकडील माहिती गोळा करण्याच्या कामाला लागले आहे.या माहितीमध्ये विद्यार्थ्यांच्या घरी मोबाईल, रेडिओ, टीव्ही आहे का, मोबाईल असेल तर अ‍ॅन्ड्राईड आहे की साधा, किती जणांच्या मोबाईलमध्ये व्हॅटस्अ‍ॅप आहे आदींसह इतर सुविधा संदर्भात शिक्षकांना माहिती घ्यावी लागत आहे. त्यामुळे शिक्षक आपल्या परीने काही पालकांच्या घरी जावून तसेच मोबाईलद्वारे संपर्क साधून यासंदर्भात माहिती घेत आहे.सध्या कोरोनामुळे सर्वच नागरिक त्रस्त आहे. अशातच शिक्षकांकडून सुरू असलेल्या सर्वेक्षणामुळे पालकांच्या अपेक्षा वाढल्या आहे.भविष्यात शासनाकडून आपल्याला काही तरी मिळतील, अशी पालकांची अपेक्षा असल्यामुळे अनेक पालक आपल्या घरी टीव्ही, रेडियो तसेच अ‍ॅन्ड्राईड मोबाईल नसल्याचे सांगून मोकळे होत आहे. तर दुसरीकडे ग्रामीण भागातील अन्य नागरिक शिक्षकांना शासनाची कोणती योजना आहे, आम्हचेही नाव टाका म्हणून सतावत असल्याचा प्रकार सुरु आहे. यामध्ये मात्र शिक्षकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.शिक्षकांना अशी द्यावी लागणार माहितीव्हॅटस्अ‍ॅप द्वारे संपर्क साधता येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, एसएमएस द्वारे संपर्क साधता येणाºया विद्यार्थ्यंची संंख्या, मोबाईल नसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या, टीव्ही सुविधा असणारे विद्यार्थी संख्या, रेडिओ सुविधा असणारे विद्यार्थी संख्या, मोबाईल, रेडिओ, टीव्ही यापैकी कोणतीही सुविधा नसणारे विद्यार्थी संख्या, किती पालकांना होम लर्निंग सुविधा उपलब्ध आहे.मुख्याध्यापकही लागले कामालाशाळेचे नाव, वर्ग, पटसंख्या, कार्यरत शिक्षक, वर्गनिहाय व्हॅटस्अ‍ॅप गृप संख्या, व्हॅटअ‍ॅपद्वारे संपर्क साधता येणाºया शिक्षकांची संख्या, एसएमएस द्वारे संपर्क साधता येणाºया शिक्षकांची संख्या, मोबाईल नसणाºया शिक्षकांची संख्या आदी संदर्भात मुख्याध्यापकांना प्रथम पंचायत समिती, केंद्रप्रमुख तसेच शिक्षण विभागाला माहिती द्यावी लागणार आहे.अनेकांकडून खोटी माहितीशिक्षकांकडून पालकांना विचारणा केल्यानंतर अनेक पालक आपल्याकडे टीव्ही, रेडिओ, अ‍ॅन्ड्राईड मोबाईल नसल्याची खोटी माहिती देत असल्याचा प्रकारही सुरु आहे. माहिती खरी दिली, तर शासनाच्या योजनांपासून आपल्याला वंचित रहावे लागेल, अशी भीती पालकांना आहे. दरम्यान, पालक शिक्षकांना मोबाईलवर संपर्क करून शासनाच्या योजनांबद्दल माहिती सांगण्याचा तगादाही लावत असल्याचा प्रकारही ग्रामीण भागात बघायला मिळत आहे.शासन योजनेपासून वंचित राहण्याची भीतीशिक्षकांकडून पालकांना विचारणा केल्यानंतर अनेक पालक आपल्याकडे टीव्ही, रेडिओ, अ‍ॅन्ड्राईड मोबाईल नसल्याची खोटी माहिती देत असल्याचा प्रकारही सुरु आहे. माहिती खरी दिली, तर शासनाच्या योजनांपासून आपल्याला वंचित रहावे लागेल, अशी भीती पालकांना आहे.अनेकांचे दुर्लक्षशिक्षण विभागाने दिलेल्या आदेशानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना माहिती गोळा करणे सुरू केले आहे. विशेष म्हणजे, अनेकांनी मोबाईलवर पालकांसोबत संवाद साधत सर्व माहिती गोळा करून शिक्षण विभागाकडे सादर केली आहे. तर काहींनी अद्यापही दुर्लक्षच केले आहे.विद्यार्थी तसेच पालकांना शिक्षणासंदर्भात घरच्या घरीच माहिती देता यावी, राज्यस्तरावरून येणारे कार्यक्रम त्यांना त्वरित कळावे, यासाठी पालकांकडील मोबाईलसंदर्भात माहिती गोळा करण्यात येत आहे. यामागील दुसरा कोणताही उद्देश नाही.-दीपेंद्र लोखंडे,शिक्षणाधिकारी, प्राथमिक जिल्हा परिषद चंद्रपूर

टॅग्स :Educationशिक्षणTeacherशिक्षक