शेतकरी आत्महत्यांबाबत रामनगर ठाण्यात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 12:02 AM2017-10-21T00:02:47+5:302017-10-21T00:02:57+5:30

शासन शेतकºयांना आत्महत्या करण्यास भाग पाडत आहे. शेतकरीविरोधी धोरणे घेऊन एक प्रकारे शेतकºयांचा खूनच करीत आहे.

 Complaint against Ramnagar Thane for Farmers' Suicides | शेतकरी आत्महत्यांबाबत रामनगर ठाण्यात तक्रार

शेतकरी आत्महत्यांबाबत रामनगर ठाण्यात तक्रार

Next
ठळक मुद्देशासन शेतकºयांना आत्महत्या करण्यास भाग पाडत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: शासन शेतकºयांना आत्महत्या करण्यास भाग पाडत आहे. शेतकरीविरोधी धोरणे घेऊन एक प्रकारे शेतकºयांचा खूनच करीत आहे. या गुन्ह्यासाठी सरकारवर खटले दाखल करण्यात यावे, या आशयाची तक्रार शेतकरी संघटनांची सुकाणू समिती व किसान क्रांतीच्या वतीने आज शुक्रवारी रामनगर ठाण्यात केली.
सरकारने सातत्याने शेतकरीविरोधी धोरणे घेतली आहेत. सरकारच्या या धोरणांमुळे शेतकºयांना आत्महत्या करण्यास भाग पाडले आहे. शेतकºयांच्या सरकारने केलेल्या या हत्याच आहेत. चुकीच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. अशा पार्श्वभूमीवर शेतकºयांनी आंदोलन करीत सरकारकडे कर्जमुक्तीची मागणी केली. सरकारला आंदोलनामुळे कर्जमुक्तीची घोषणा करावी लागली. पण कर्जमुक्त करताना मात्र सरकारने आपले आश्वासन व शब्द न पाळता अनेक अटी लावत शेतकºयांची घोर फसवणूक केली आहे.
सरकारने कर्जमाफीसाठी जाणीवपूर्वक आॅनलाईनचा व अटीशर्तीचा गोंधळ घातला आहे. लाखो शेतकरी या गोंधळामुळे कर्जमाफीपासून वंचित राहणार आहे. केवळ निम्म्याच शेतकºयांना कर्जमाफीसाठी अर्ज भरता आले व उर्वरित तब्बल ३१ लाख शेतकरी कर्जमाफीचे साधे अर्जसुद्धा भरु शकले नाही. अर्ज भरलेल्या ५८ लाख शेतकºयांपैकी जे शेतकरी सरकारच्या अटीमध्ये बसतील, त्यांनाच केवळ कर्जमाफीचा लाभ होणार आहे. परिणामी अत्यंत थोड्या शेतकºयांना कर्जमाफी मिळणार असून बहुतांश शेतकरी कर्जमाफीतून वगळले जाणार आहे.
शेतकरी संघटनाच्या सुकाणू समितीने सरकारच्या या ऐतिहासिक फसवणूकीचा बुरखा वारंवार फाडला आहे. जळगाव येथे झालेल्या राज्यव्यापी परिषदेतही सुकाणू समितीने सरकारची ही लबाडी लोकांच्या समोर उघड करुन याविरोधात रणशिंग फुंकण्याची हाक दिली आहे.
दरम्यान, आज शुक्रवारी दुपारी २ वाजता सुकाणू समिती व किसान क्रांतीचे कार्यकर्ते जटपुरा गेट येथे जमा झाले. त्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर रामनगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदविली. सरकावर फसवणुकीचा ४२०, शेतकºयांना आत्महत्या करण्यास भाग पाडण्याचा ३०६ व शेतकºयांच्या हत्या केल्याप्रकरणी ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी तक्रारीत केली. यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष पप्पू देशमुख, प्रदीप बोबडे, बापुराव मडावी, गणेश झाडे, मारोती बुरवटकर, प्रकाश ताजने, ज्ञानेश आत्राम, महेश धोंगडे आदी उपस्थित होते.

Web Title:  Complaint against Ramnagar Thane for Farmers' Suicides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.