पर्यावरणपूरक वीज निर्मितीसाठी कोळशाला कन्व्हेअर पाईपची पायघडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2022 05:00 IST2022-01-01T05:00:00+5:302022-01-01T05:00:45+5:30

वीज केंद्रानेही पर्यावरणपूरक वीज निर्मितीच्या दृष्टीने कन्व्हेअर पाईपचा प्रयोग पहिल्यांदाच महाराष्ट्रात राबविला. ही बाब चंद्रपूरकरांच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली असून, याचे चांगलेच परिणाम २०२२ या वर्षांत दिसून येतील. चंद्रपुरात केवळ उद्योगांचे प्रदूषण नाही, तर शहरातील रस्त्याने उडणारी धूळही तेवढीच कारणीभूत ठरत आहे. शहराची स्वच्छता केवळ पुरस्कार प्राप्त करण्यापुरती असू नये. दररोज स्वच्छतेवर भर दिल्यास धुळीचा विपरित परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होणार नाही. 

Coal conveyor pipe footing for environmentally friendly power generation | पर्यावरणपूरक वीज निर्मितीसाठी कोळशाला कन्व्हेअर पाईपची पायघडी

पर्यावरणपूरक वीज निर्मितीसाठी कोळशाला कन्व्हेअर पाईपची पायघडी

राजेश भोजेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याचाच एक भाग म्हणून चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील कालबाह्य झालेले ३ व ४ क्रमांकाचे संच बंद करण्याचा सूर पर्यावरणवाद्यांमधून घुमत आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने हे पाऊल नव्या वर्षांत चंद्रपूरकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने तेवढेच महत्त्वाचे असणार आहे. यासोबतच वीज केंद्रानेही पर्यावरणपूरक वीज निर्मितीच्या दृष्टीने कन्व्हेअर पाईपचा प्रयोग पहिल्यांदाच महाराष्ट्रात राबविला. ही बाब चंद्रपूरकरांच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली असून, याचे चांगलेच परिणाम २०२२ या वर्षांत दिसून येतील. चंद्रपुरात केवळ उद्योगांचे प्रदूषण नाही, तर शहरातील रस्त्याने उडणारी धूळही तेवढीच कारणीभूत ठरत आहे. शहराची स्वच्छता केवळ पुरस्कार प्राप्त करण्यापुरती असू नये. दररोज स्वच्छतेवर भर दिल्यास धुळीचा विपरित परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होणार नाही. 
याची काळजी नव्या महानगरपालिका घेतील, अशी आशा बाळगायला हरकत नाही. वीज केंद्राने सुमारे २०० कोटी रुपये खर्चून उभारलेला कन्व्हेअर पाईपचा प्रकल्प उभारला. वीज निर्मितीसाठी ट्रकद्वारे येणार कोळसा खाणीतून आता पाईपद्वारे थेट वीज केंद्रात येत आहे. 
ही मोठी उपलब्धी मानली जाते. 

विरोधापेक्षा सकारात्मक प्रयत्न कामी येतात
वीज केंद्राचे मुख्य अभियंता पंकज सपाटे हे मूळचे चंद्रपूरचे आहेत. त्यांच्याच हातात वीज केंद्राची धुरा आहे. आपल्या कारकीर्दीत चंद्रपूर वीज केंद्रातून होणारे प्रदूषण कमी करणे, हा आपला मुख्य हेतू असल्याचे ते वारंवार सांगतात. याच काळात कन्व्हेअर पाईपचा प्रकल्प उभा राहिला. उद्योग असेल, तर रोजगार येतो. उद्योग नसेल, तर उद्योगाची मागणी होते. आहे तो उद्योग पर्यावरणपूरक पद्धतीने चालविण्यासाठी तेथील जनतेचे सहकार्य गरजेचे असते. ही त्यांची भावना आहे. तोडगा दिला तर नक्कीच मार्ग निघेल, असा त्यांचा विश्वास आहे.

 

Web Title: Coal conveyor pipe footing for environmentally friendly power generation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज