डाटा एंट्री आॅपरेटर्सच्या ठिय्या आंदोलनाने जिल्हा परिषदेत गोंधळ

By Admin | Updated: August 11, 2014 23:49 IST2014-08-11T23:49:07+5:302014-08-11T23:49:07+5:30

मागील तीन महिन्यात काहीच काम न केल्याचा ठपका ठेवत राज्यातील तब्बल तीन हजार डाटा एंट्री आॅपरेटरांसह जिल्ह्यातील ५५ आॅपरेटर्सचाही समावेश आहे. त्यांनी सोमवारी दुपारी जिल्हा

The clutter of the Zilla Parishad by the movement of data entry operators | डाटा एंट्री आॅपरेटर्सच्या ठिय्या आंदोलनाने जिल्हा परिषदेत गोंधळ

डाटा एंट्री आॅपरेटर्सच्या ठिय्या आंदोलनाने जिल्हा परिषदेत गोंधळ

चंद्रपूर : मागील तीन महिन्यात काहीच काम न केल्याचा ठपका ठेवत राज्यातील तब्बल तीन हजार डाटा एंट्री आॅपरेटरांसह जिल्ह्यातील ५५ आॅपरेटर्सचाही समावेश आहे. त्यांनी सोमवारी दुपारी जिल्हा परिषदेच्या संगणक कक्षात केलेल्या ठिय्या आंदोलनाने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
वरीष्ठ अधिकारी प्रत्यक्ष येवून चर्चा करण्याचा शब्द देत नाही आणि मागण्या मान्य करत नाही तोवर परत जाणार नाही, अशी भूमिका घेतल्याने पेच वाढला होता. अखेर युनिटी आयटीचे विभागीय व्यवस्थापक अनंत रघुते यांनी प्रतिनिधी पाठवून चर्चा करण्याचे भ्रमणध्वनीवरुन मान्य केले. तेव्हा कुठे आंदोलन मागे घेण्यात आले.
जिल्ह्यातील डाटा एंट्री आपरेटर्सनी मे, जून आणि जुलै या तीन महिन्यात काहीही काम न केल्याच्या सबबीखाली ७ आॅगस्टपासून अचानक कामावरून कमी करण्यात आले आहे. त्यामुळे पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन उभारले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: The clutter of the Zilla Parishad by the movement of data entry operators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.