स्वच्छता दूत म्हणून विद्यार्थी देणार स्वच्छतेचा संदेश
By Admin | Updated: November 11, 2014 22:37 IST2014-11-11T22:37:08+5:302014-11-11T22:37:08+5:30
राज्य शासनाने २००२ मध्ये संत गागडेबाबा तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम स्वच्छता अभियान राबवून गावात स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. या अंतर्गत अनेक गावांनी स्वच्छता करून पुरस्कार मिळविले.

स्वच्छता दूत म्हणून विद्यार्थी देणार स्वच्छतेचा संदेश
चंद्रपूर : राज्य शासनाने २००२ मध्ये संत गागडेबाबा तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम स्वच्छता अभियान राबवून गावात स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. या अंतर्गत अनेक गावांनी स्वच्छता करून पुरस्कार मिळविले. तरीही आजघडीला अनेक गावांमध्ये अस्वच्छतेचे वातावरण आहे. यामुळे आरोग्याचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान हाती घेतला आहे. या अभियानातून गाव स्वच्छ होणार आहे. मात्र आजही जनजागृतीची कमी आहे. त्यामुळे आता शाळांतील विद्यार्थी स्वच्छता दूत म्हणून गावागावांत जनजागृती करणार आहे.
राज्य शासनाने हा उपक्रम सुरु केला असून बालकदिनापासून विद्यार्थी स्वच्छतेसाठी सरसावणार आहे. अस्वच्छतेमुळे गाव तसेच शहरातील नागरिकांचे आरोग्य सध्या धोक्यात आले आहे. अनेक आजारांना समोर जावे लागत आहे. जर प्रत्येकांनी स्वच्छतेचे महत्त्व समजून घेतले आणि त्याची अंमलबजावणी केली तर, भविष्यात स्वच्छ भारत अभियान राबविण्याची गरजच पडणार नाही.
विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटले तर ते कुटुंबीय, परिसर आणि गावालाही स्वच्छ करू शकतात. यासाठी शासनाने आता शाळांमधून ‘स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय’ ही मोहीम सुरु केली आहे. १४ नोव्हेंबरपासून विद्यार्थी तसेच शिक्षक स्वच्छतेचे महत्त्व नागरिकांना पटवून देणार आहे. यासाठी प्रथम विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे धडे देणार येणार आहे. यासाठी शिक्षकांना पुढाकार घ्यावा लागणार आहे. स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी प्रत्येक शाळांतील विद्यार्थी स्वच्छता दूत म्हणून काम करणार असून तीन ते चार कुटुंबांना भेटी देवून स्वच्छतेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहचविणार आहे.
पंतप्रधान मोदी यांनी दिलेला स्वच्छतेचा कानमंत्र आता गावागावात राबविला जात असून स्वच्छतेबाबत दक्षता घेतली जाणार आहे. (नगर प्रतिनिधी)
असे राबविणार शाळांत उपक्रम
४ नोव्हेंबर - स्वच्छता व आरोग्य विषयक शपथ, मुख्याध्यापक विद्यार्थी तसेच शाळा व्यवस्थापन समितीला स्वच्छतेवर मार्गदर्शन करणार आहे. त्यानंतर परिसर स्वच्छता, वर्गखोल्या, ग्रंथालय, प्रयोगशाळांची स्वच्छता. सुंदर वर्गखोली स्पर्धा घेऊन शाळेमध्ये उत्कृष्ट वर्ग म्हणून गौरविण्यात येणार आहे. इमारत व परिसर स्वच्छतेवर निबंध स्पर्धा घेण्यात येणार आहे.
१५ नोव्हेंबर- आरोग्य केंद्राला भेट, संतुलित आहार व आरोग्याची काळजी यावर माहिती, जेवनापूर्वी, शौचालयास जाऊन आल्यानंतर हाताची स्वच्छता कशी करावी यावर मार्गदर्शन
१७ नोव्हेंबर- स्वत:ची स्वच्छता, स्वत:च्या खोली, परिसर स्वच्छ ठेवण्याचे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे. माता-पालक मेळाव्यांचे केंद्र पातळीवर आयोजन, माता-पालक मेळावा, किशोरवयीन मुलींमध्ये जागृती करण्यात येणार आहे.
१८ नोव्हेंबरला स्वच्छ पाणी, सुरक्षित हाताळणी, निर्जंतुकीरण आदींवर मार्गदर्शन, पाणी शुद्धीकरण केंद्राला भेट, एवढेच नाही तर बालकांकडून पाणी बचत, स्वच्छ पाणी यासारख्या घटकांवर स्टीकर लावण्याबाबत सांगण्यात येणार आहे. अशुद्ध पाण्यामुळे होणारे रोग याबाबत माहिती देऊन ते