शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

श्रमदानातून इरई नदीची स्वच्छता

By admin | Updated: March 23, 2015 01:11 IST

दाताळा मार्गावरील इरई नदी पुलावरुन सतत पूजाअर्चेचे सामान फेकल्यामुळे नदीच्या पात्रात घाण पसरली आहे.

चंद्रपूर : दाताळा मार्गावरील इरई नदी पुलावरुन सतत पूजाअर्चेचे सामान फेकल्यामुळे नदीच्या पात्रात घाण पसरली आहे. या घाणीमुळे अडकलेल्या प्लास्टिक, वनस्पतींचा तयार झालेला दोन-तीन फुटांचा घाणीचा थर रविवारी जागतिक जल दिनानिमित्त स्वच्छ करण्यात आला. प्रहार संघटनेने जागतिक जलदिनाचे औचित्य साधून हे अनोखे आंदोलन केले. शहरातील विविध संघटना व नागरिकांनी एकत्र येऊन फावडे घेवून नदी पात्रात उतरले. पाय ठेवायला जागा नसलेल्या ठिकाणी पाच तासानंतर नदीचे स्वच्छ पाणी दिसायला लागले. त्यानंतर पुलावर ‘इरई आमची आई, आता घाण करायची नाही’ जागतिक जल दिनांच्या हार्दिक शुभेच्छा असा संदेश लिहून श्रमदानाची सांगता करण्यात आली.इरई नदीला लागून असलेल्या वसाहतीमधील पूर पीडितांच्या मागण्यांसाठी प्रहार संघटनेने जागतिक जलदिनाचे औचित्य साधून आंदोलनाला सुरुवात केली. या आंदोलनात प्रहार सोबत वृक्षाई, मुस्लीम हक्क संघर्ष समिती, गाज-ए-हिंद, सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंट, मनोवेध व परिसरातील अनेक जागृत नागरिकांनी सहभाग घेतला.जिल्हा प्रशासनातर्फे साडेअकरा कोटी खर्च करुन इरई नदीचे खोलीकरण करण्यात येणार आहे. हे खोलीकरण व्यावहारिक तत्त्वावर कंत्राट देऊन करण्याऐवजी लोकसहभागातून करावे, त्यासाठी शहर व जिल्ह्यातील कंत्राटदार, ट्रान्स्पोर्टर्स, उद्योजक व सामान्य नागरिकांचा सहभाग घ्यावा, पूरपीडितांना मनपाने दिलेले नोटीस परत घ्यावे, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. यावेळी पप्पु देशमुख, कुशब कायरकर, हाजी अनवर अली, सादीक कुरेशी, दिलीप घोरे, प्रशांत आर्वे, फिरोज खान पठाण, घनश्याम येरगुडे आदी सहभागी होते.