शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

साथीच्या आजारांचे खापर वटवाघुळांवर फोडणे धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 07:00 IST

मानवी हस्तक्षेप दुर्लक्षित करून साथीच्या आजारांचे खापर केवळ वटवाघुळांवरच फोडणे सुरू राहिल्यास जगभरातील वटवाघुळांच्या वसाहती उद्ध्वस्त होतील, असा दावा ताडोबा राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीव व वटवाघूळ अभ्यासक अनिरूद्ध चावजी यांनी लोकमतशी बोलताना केला.

ठळक मुद्देजगभरातील वटवाघुळांच्या वसाहती उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर

राजेश मडावीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : भारतीय आणि जगाच्या पाठीवरील काही देशांमध्ये वटवाघूळ हा निरूपद्री, दिसायला अत्यंत कुरूप, झाडाला उलटा लटकणारा व रात्री संचार करणारा निशाचर म्हणून अशास्त्रीय व विविध धर्मप्रेरित मिथकांचा सातत्याने बळी ठरत आला आहे. वटवाघूळ स्वत:हून कुणाच्या वाट्याला जात नाही. त्याची उपयुक्तता सर्वविदीत आहे. बहुतांश प्राणी-पक्ष्यांमध्ये विषाणू असतात, वटवाघूळातही आहेत. निपाह व्हायरसपासून तर कोरोना व्हायरससाठी वटवाघुळेच जबाबदार असल्याचे अद्याप सिद्ध झाले नाही. मात्र, मानवी हस्तक्षेप दुर्लक्षित करून साथीच्या आजारांचे खापर केवळ वटवाघुळांवरच फोडणे सुरू राहिल्यास जगभरातील वटवाघुळांच्या वसाहती उद्ध्वस्त होतील, असा दावा ताडोबा राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीव व वटवाघूळ अभ्यासक अनिरूद्ध चावजी यांनी लोकमतशी बोलताना केला.कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर भारतात, महाराष्ट्रात व जगभरात वटवाघूळ अभ्यासक्षेत्रात नेमके काय चालले आहे, यासंदर्भात माहिती देताना अनिरूद्ध चावजी म्हणाले, वटवाघूळांच्या जगात १११, भारतात १२९ आणि महाराष्ट्रात सुमारे ५० जाती आहेत. प्राणीशास्त्रानुसार वटवाघूळांचे मायक्रोबॅट व मेगाबॅट या दोन प्रकारात वर्गीकरण केल्या जाते. त्यामध्ये कीटकभक्ष्यी व फळभक्ष्यी या प्रकारांना अतिशय महत्त्व आहे. वटवाघूळांच्या पंखांना बोटं व उपांग असतात. कान तीक्ष्ण असतात. त्या साधारणत: २० किमी उडू शकतात. वटवाघूळांवर विषाणूंचा फारसा अनिष्ट परिणाम होत नसल्याचे आतापर्यंतच्या अभ्यासातून आढळून आले आहे. ते स्वत: आजारी न पडता कित्येक प्रकारच्या विषाणूंना आश्रय देऊ शकतात. इबोला, निपाह आणि आता कोरोनासारख्या प्राणीजन्य आजारांच्या विषाणूंचे यजमानही तेच असल्याचा केवळ संशय घेतला जात आहे. पण अद्याप सिद्ध झाले नाही, असेही चावजी यांनी सांगितले.वटवाघूळांची उपयोगितावटवाघूळांमध्ये २० टक्के फळभक्षी व ८० कीटकभक्षी असतात. फळभक्षी वटवाघूळांमुळे निसर्गाची परिसंस्था निरोगी राहते. बहुविध फळ-झाडांची बियाणे रूजविण्याचे काम वटवाघूळांकडून विष्ठेद्वारे होते. हा उडणारा एकमेव सस्तन प्राणी आहे. वटवाघूळे मार्गक्रमण व शिकारीसाठी प्रतिध्वनी स्थाननिर्धारण तंत्र म्हणजे इको-लोकेशनचा वापर करतात. या तंत्राद्धारे एका तासात १,२०० व एका रात्री सहा ते सात हजार डासांच्या आकाराचे किटक खाऊ शकतात. रात्री अंधारात पाण्यातून मासे पकडू शकतात, इतके चित्तथरारक तंत्रज्ञान त्याला अवगत आहे. नाईट व्हीजन कसे असते, हे मानवाने वटवाघूळाकडून शिकण्याची गरज आहे, अशी माहिती चावजी यांनी दिली.चुका मानवाच्या, आरोपीच्या पिंजऱ्यात वटवाघूळ२०१९ मध्ये सार्स कोविड-२ या आजाराची साथ आली होती. तिचा संबंध चीनच्या वुहानमधील माणसांना खाण्यासाठी मांडलेल्या जिवंत प्राण्यांच्या वेट मार्केट शी असल्याचे मानले जाते. मात्र, नंतर झालेल्या अभ्यासातून त्या रोगाचा प्रसारस्त्रोत अन्य प्राण्यांत आढळल्याचे सिद्ध झाले. यात सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा की हे प्राणी अशा बाजारात आणले कुणी. खरे तर मानवाचा आणि वटवाघूळांचा अधिवास पूर्णत: वेगळा आहे. त्यामुळेच जागतिक आरोग्य संघटनेने जगभरातील ओले बाजार बंद करा, अशा सूचना दिल्या आहेत. वटवाघूळांच्या वसाहती उद्ध्वस्त झाल्या तर किटकांची संख्या प्रचंड वाढेल. यातून पिकांच्या उत्पादनात मोठी घट होऊन मानवी जीवनावर दुष्परिणाम होईल. त्यामुळे मानवाने चुका टाळून वटवाघूळांना आरोपीच्या पिंजºयात टाकण्यापेक्षा निसर्गातील हस्तक्षेप टाळला पाहिजे, असा सल्ला अनिरूद्ध चावजी यांनी दिला.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस