शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

जनआक्रोश आंदोलनाची जय्यत तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 23:56 IST

प्रदेश कॉग्रेसतर्फे राज्य सरकारच्या विरोधात ६ नोव्हेंबरला चंद्रपुरात विभागीय जनआक्रोश आंदोलनाचे आयोजन चांदा क्लब गाऊंडवर केले आहे.

ठळक मुद्देदोन वेगवेगळ्या ठिकाणी कार्यकर्ते कामाला : पोलिसांचीही बंदोबस्ताची तयारी पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : प्रदेश कॉग्रेसतर्फे राज्य सरकारच्या विरोधात ६ नोव्हेंबरला चंद्रपुरात विभागीय जनआक्रोश आंदोलनाचे आयोजन चांदा क्लब गाऊंडवर केले आहे. या मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी काँग्रेसचे उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार हे चंद्रपुरात तळ ठोकून आहेत. तर दुसरीकडे विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्यावतीने इंदिरा गांधी गार्डन स्कूलवरही तयारीला गती आली आहे. या दोन्ही कार्यक्रमांसाठी आयोजकांकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांनीही बंदोबस्ताची तयारी पूर्ण केली आहे.चांदा क्लब गाऊंडवर मोठा पेंडाल टाकण्यात येत आहे. दरम्यान, सदर आंदोलनाबाबत गुरुवारी आ. विजय वडेट्टीवार यांनी इंदिरा नगर प्रभागात सभा घेतली. आंदोलनाबाबत आढावा घेतला.६ नोव्हेंबरला चंद्रपुरात भाजपा सरकारच्या विरोधात काँग्रेसजण जनआक्रोश व्यक्त करणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. अशोक चव्हाण राहणार आहेत. तसेच सदर मेळाव्याला विदर्भातून असंख्य नागरिक उपस्थित राहणार असल्याने चांदा क्लब गाऊंडवर ५० हजार नागरिक येणार असल्याचा अंदाज बांधला जात आहे. अशी व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच महिला व पुरुषांच्या बसण्याची स्वतंत्र्य व्यवस्था करण्यात आली आहे. याचबरोबर व्यासपिठासाठी साडेपाच फूट उंचीचा मंच तयार करण्यात आला आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध प्रभागात सभा घेण्यात येत आहे. गुरुवारी आ. विजय वडेट्टीवार यांनी सभा घेतली. या सभेला चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदू नागरकर, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, माजी जिल्हाध्यक्ष सुभाषसिंह गौर, युवक काँग्रेस अध्यक्ष शिवा राव, असंघटीत कामगार विभाग शहर अध्यक्ष अनिल सुरपाम, अमजद अली, नगरसेवक शालिनी भगत, सुनिता अग्रवाल, राजेश अड्डूर आदी उपस्थित होते.मजदूर काँग्रसेतर्फे शेतकरी कामगार मेळावाप्रदेश काँग्रेसने राज्य सरकारच्या विरोधात जनआक्रोश आंदोलनाची घोषणा केल्यानंतर माजी खासदार नरेश पुगलिया यांनी विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्या वतीने ६ नोव्हेंबरलाच न्यू इंग्लिश हायस्कूलच्या ग्राऊंडवर शेतकरी कामगार मेळाव्याच्या आयोजनाची घोषणा केली. मात्र जिल्हा पोलीस प्रशासनाने विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्या कामगार मेळाव्याची परवानगी नाकारल्यामुळे सदर मेळावा इंदिरा गांधी गार्डन स्कूलच्या मैदानावर आयोजित करण्यात येत आहे. विदर्भ किसान मजदूर काँग्रेसनेसुद्धा कामगार मेळाव्याची जय्यत तयारी सुरु केली आहे. या मेळाव्याला विशेष अतिथी म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सतिश चतुर्वेदी, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी मंत्री नितीन राऊत, माजी मंत्री अनिस अहमद, माजी मंत्री वसंत पुरके, माजी आमदार गेव्ह आवारी, माजी खासदार मारोतराव कोवासे, आ. सुनील केदार, आ. अमर काळे. आ. गोपाल अग्रवाल, अशोक धवड, माजी आमदार प्रभाकर मामूलकर, माजी आमदार बाबुराव वाघमारे आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती चंद्रपूर शहर जिल्हा कॉग्रेसचे अध्यक्ष गजानन गावंडे यांनी दिली.