एकाच इमारतीच्या छताखालून होणार नागरिकांची कामे

By Admin | Updated: September 2, 2015 00:51 IST2015-09-02T00:51:06+5:302015-09-02T00:51:06+5:30

राजुरा शहरातील स्वातंत्र्योत्तर काळातील तहसिल कार्यालयाची इमारत जीर्ण अवस्थेत गेली होती.

Citizen's work will be done through the roof of the same building | एकाच इमारतीच्या छताखालून होणार नागरिकांची कामे

एकाच इमारतीच्या छताखालून होणार नागरिकांची कामे

त्रास होणार दूर : राजुरा तहसील कार्यालयाची इमारत पूर्णत्वास
राजुरा : राजुरा शहरातील स्वातंत्र्योत्तर काळातील तहसिल कार्यालयाची इमारत जीर्ण अवस्थेत गेली होती. राजुरा शहरात सुंदर इमारत असावी, येणाऱ्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सर्व कार्यालयीन कामे एकाच छताखालून व्हावे, यासाठी चार कोटी ५२ लाखांचा निधी राजुराचे तत्कालीन आमदार सुभाष धोटे यांनी खेचून आणला होता. आज या निधीतून प्रशस्त इमारत उभी झाली आहे.
कामाचे भूमिपूजन तत्कालीन महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार प्रभाकर मामुलकर यांच्या उपस्थित झाले. आता इमारत पूर्णत्वास येत असून या ठिकाणी एकाच ठिकाणी आठ प्रकारची कार्यालये राहणार आहे. यामध्ये तहसिल कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय, तालुका हत्तीरोग अधिकारी कार्यालय, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, सामाजिक वनीकरण कार्यालयाचा समावेश आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून एकदा आलेला व्यक्ती सर्व प्रकारची कामे करूनच कार्यालयाच्या बाहेर निघणार आहे.
ज्या ठिकाणी सुंदर तहसील कार्यालयाची इमारत उभी आहे ती जागा तहसिल कार्यालयाची नव्हती. याची माहिती मिळताच माजी आमदार सुभाष धोटे यांनी तत्कालीन महसुल विभागाचे कमिशनर वेणु गोपाल रेड्डी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून जागा तहसिल कार्यालयाच्या नावाने करून घेतली. यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचेही मोठे सहकार्य मिळाले होते. आज ही इमारत पुर्णत्वास आली आहे. (शहर प्रतिनिधी)
संपात विविध संघटनांचा सहभाग
चंद्रपूर : उद्या २ सप्टेंबरला विविध संघटनांतर्फे देशव्यापी संप करण्यात येणार आहे. यात विविध संघटनांचा सहभाग आहे. आयटक या राष्ट्रीय कामगार संघटनेच्या वतीने उद्या २ सप्टेंबरला देशव्यापी संप करण्यात येणार आहे. या देशव्यापी संपात राज्य व केंद्र शासनाच्या कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन येथील आयटकचे पदाधिकारी राजू गैनवार यांनी केले आहे. कामगार कायद्यातील कामगार विरोधी बदल रद्द करण्यात यावा, वाढत्या महागाईला आळा घालावा, बेरोजगारी कमी करावी, उद्योगांना सवलती देताना स्थानिकांना नोकऱ्या देण्यात याव्या या मागण्यांचा समावेश आहे.

Web Title: Citizen's work will be done through the roof of the same building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.