प्रदूषणास उद्योगासोबतच नागरिकही जबाबदार

By Admin | Updated: April 22, 2016 02:54 IST2016-04-22T02:54:44+5:302016-04-22T02:54:44+5:30

चंद्रपूर हे देशात सहाव्या क्रमांकाचे प्रदूषीत शहर आहे. येथे दोन कृती आराखडे आखून सुद्धा प्रदूषण कमी झाले नाही.

Citizens responsible for pollution along with the industry | प्रदूषणास उद्योगासोबतच नागरिकही जबाबदार

प्रदूषणास उद्योगासोबतच नागरिकही जबाबदार

चंद्रपूर : चंद्रपूर हे देशात सहाव्या क्रमांकाचे प्रदूषीत शहर आहे. येथे दोन कृती आराखडे आखून सुद्धा प्रदूषण कमी झाले नाही. चंद्रपुरातील प्रदूषण व त्यावर उपाय योजना करण्यासाठी निरीने अभ्यास केला. यातून वाढत्या प्रदूषणास थर्मल पॉवर स्टेशन, सिमेंट उद्योग, कोळसा खाणी हे कारणीभूत असून त्याचसोबत नागरिकही जबाबदार असल्याचे निरीच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
राज्य शासनाने चंद्रपूर-वणी क्षेत्राचा अभ्यास करुन उपाय योजना करण्यासाठी निरीला व आयआयटी पवईला अभ्यास करण्यास सांगितले होते. त्यानुसार २०१३-१४ या वर्षात राष्ट्रीय पर्यावरण व अभियांत्रिकी संशोधन संस्था निरीने चंद्रपूरच्या प्रदूषणाचे स्त्रोत, कारणे व उपाय यावर एक वर्ष अभ्यास करुन अहवाल सादर केला आहे.
निरीने चंद्रपूर जिल्ह्यातील ४० बाय ४० किमी परिसरातील १७ प्रमुख उद्योगांच्या ४७ धुराळ्यांचा अभ्यास केला. चंद्रपुरातील सहा प्रदूषण मापक केंद्राचा २४ तास सल्फरडाय आॅक्साइड, नायट्रोजन डायआॅक्साईड, हवेत आणि श्वसनात जाणाऱ्या धुलीकनाच्या प्रदूषणाची आकडेवारी गोळा केली. त्यात कोळश्यावर आधारीत वीज केंद्र, कोळसा खाणी, सिमेंट उद्योग, लोहखनिज उद्योग, कागद कारखाने, रासायनिक उद्योग व शहरातील नागरिकांचे प्रदूषण कोळसा जाळणे, स्वयंपाकाचा गॅस, लाकडे जाळणे यांचा समावेश असल्याची माहिती पर्यावरण अभ्यासक तसेच केंद्रीय पर्यावन वने व जयवायू परिवर्तन मंत्रालय दिल्लीचे क्षेत्रीय समिती सदस्य प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

सिमेंट उद्योगातून सर्वाधिक वायू प्रदूषण
वायू प्रदूषणाच्या बाबतीत ९० टक्के वाटा सिमेंट उद्योगांचा आहे. सल्फरडाय आॅक्साईड हे या उद्योगातून वायू प्रदूषण होते. ५ टक्के वाटा पॉवर प्लांटचा आहे तर ५ टक्के वाटा लोहा खनिज उद्योगांचा आहे. नायट्रोजनडाय आॅक्साईड प्रदूषणाच्या बाबतीत सर्वात जास्त ५१ टक्के प्रदूषण थर्मल पॉवर प्लांट तर ४९ टक्के वाटा सिमेंट उद्योगांचा आहे.

वाहनेही करतात धूर प्रदूषण
१९५१ मध्ये चंद्रपूरची लोकसंख्या ४२ हजार ७५१ इतकी होती. तर २०११ मध्ये ती ३ लाख २१ हजार ३६ इतकी वाढली. त्या तुलनेत २००६ मध्ये १७ लाख ७ हजार २२५ लाख वाहने होती. ती २०११ मध्ये वाढून २८ लाख १ हजार ७६४ झाली. यातून धुलीकण, कार्बन मोनोक्साईड, हायड्रोकार्बन, नायट्रोजन आॅक्साईड इत्यादी वायूंचे उत्सर्जन होते. दोन-तीन चाकी वाहने, पेट्रोल डीझेल चार चाकी वाहने, बसेस, हलकी व जड वाहने मिळून दरवर्षी ३६.४० टन धुलीकन, ५३५.१२ टन कार्बन मोनोआॅक्साईड, १२५२.७१ टन हायड्रोकार्बन आणि ११६०.२९ टन नायट्रोजन आॅक्साईड उत्सर्जित होते. हे सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणातील प्रदूषण आहे.

सीटीपीएसमुळे सर्वाधिक धुलीकण
चंद्रपूर, भद्रावती, बल्लारपूर, राजुरा एवढ्याच मर्यादित क्षेत्रात सर्व कोळसा खाणी, सिमेंट उद्योग, थर्मल प्लाँट, लोह व कागद उद्योग अशी लहान, मोठी उद्योग आहेत. त्यामुळे प्रदूषण जास्त आहे. जिल्ह्यात धुलीकणाच्या बाबतीत सर्वात जास्त ७५ टक्के धुलीकनाचे प्रदूषण चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशनचे आहे. त्यानंतर १८ टक्के धुलीकण प्रदूषण सिमेंट उद्योगांचे आहे. ४ टक्के वाटा लोह उद्योगाचा तर ३ टक्के वाटा कागद उद्योग, मल्टी आॅर्गनिक व इतर लहान उद्योगांचा आहे.

जळाऊ लाकडांपासूनही वाढले प्रदूषण
चंद्रपूर शहरातील झोपडपट्टीत वर्षाला कमीत कमी ३०० टन कोळसा जाळला जातो. त्यातून आरोग्यास सर्वात जास्त हानीकारक वायूंचे उत्सर्जन होते. एलपीजी गॅस मुळे दरवर्षी ३.५२ टन, सल्फर डाय आॅक्साईड ७.०३ टन, नायट्रोजन आॅक्साईड २.२१ टन व मोठ्या प्रमाणात हायड्रोकार्बन उत्सर्जित होत आहे. मृत्यूनंतर दहन विधीसाठी लागणारी लाकडे, झोपडपट्टीत जळाऊ लाकडांसाठी केरोसीनचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. तसेच नागरीक मोठ्या प्रमाणातत प्लॉस्टिक, कचरा जाळतात. बेकरी व हॉटेल्स आदी त्यातून मोठ्या प्रमाणात धुलीकन, सल्फरडाय आॅक्साईड, नायट्रोजन आॅक्साईड व कार्बन मोनोक्साईड उत्सर्जित होते. तसेच बांधकाम, शहर सफाई यातून धुलीकरण उत्सर्जित होते. या गतिविधी लहान वाटत असल्या तरी सामूहीकरित्या त्यातून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे.

Web Title: Citizens responsible for pollution along with the industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.