चिमुरात आमदारांनी राबविला ‘भाऊ बहिणीच्या दारी...’ उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:32 IST2021-08-25T04:32:45+5:302021-08-25T04:32:45+5:30
मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे कार्यक्रम घेण्यात आले नाहीत. परंतु यंदा मात्र ‘भाऊ बहिणीच्या दारी राखी बांधण्यासाठी’ हा उपक्रम आमदार ...

चिमुरात आमदारांनी राबविला ‘भाऊ बहिणीच्या दारी...’ उपक्रम
मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे कार्यक्रम घेण्यात आले नाहीत. परंतु यंदा मात्र ‘भाऊ बहिणीच्या दारी राखी बांधण्यासाठी’ हा उपक्रम आमदार बंटी भांगडिया यांनी मासळ मदनापूर जिल्हा परिषद क्षेत्रात राबविला. स्वत: विविध गावात जाऊन त्यांनी बहिणींकडून राखी बांधून घेतली. शेकडो बहिणींनी शेतीकामावर न जाता घरीच राहून आमदार भांगडिया यांना राखी बांधून हा सण साजरा केला.
याप्रसंगी भाजप तालुका अध्यक्ष राजू पाटील झाडे, महिला आघाडी तालुका अध्यक्षा माया ननावरे, माजी सभापती प्रकाश वाकडे, प्रकाश बोकारे, ओमप्रकाश गणोरकर, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक कलिम शेख, प्रवीण गणोरकर, समीर राचलवार, रमेश कंचर्लावार, डॉ. देवनाथ गंधरे, सरपंच गजानन गुळध्ये, सरपंच वच्छला वरखेडे, सरपंच शोभा कोयचाडे, सरपंच चंद्रकला पाटील, छाया कंचर्लावार, भारती गोडे, नाजमा शेख, कल्याणी सातपुते, दुर्गा सातपुते, ममता गायकवाड, वर्षा लोणारकर, रत्नमाला मेश्राम, सोमा गोरवे, टीमु बलदवा, अमित जुमडे उपस्थित होते.
240821\img_20210823_164300.jpg
आमदार बंटीभाऊ भांगडीया रक्षाबंधन साठी बहिणीच्या