चिमुरात देशी दारुसह २० लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 05:00 AM2019-11-17T05:00:00+5:302019-11-17T05:01:02+5:30

बोलेरो पीकअप वाहनातून दारू तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती चिमूर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाला मिळाली होती. माहितीच्या आधारे जांभुळघाट ते नेरी रोडवर सापळा रचण्यात आला. पीकअप वाहनाच्या पाठीमागून येणाऱ्या दुसºया स्विफ्ट वाहनाने समोरील दारूने भरलेल्या पीकअप वाहनाचा पाठलाग केला.

Chimura confiscates Rs. 20,90,000 worth of indigenous liquor | चिमुरात देशी दारुसह २० लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त

चिमुरात देशी दारुसह २० लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त

Next
ठळक मुद्देएकाला अटक। उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : नागपूर येथून जांभुळघाटमार्गे अवैधरित्या दारूची वाहतूक होत असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी चिमूर यांच्या दारूबंदी पथकातील पोलीस उपनिरीक्षक ग्यानेन्द्र तिवारी यांच्या नेतृत्वातील पथकाने सापळा रचून पीकअप वाहनासह तब्बल २० लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त करुन एकाला अटक करण्यात आली. रोहित कमलाकर पाटील रा. नंदोरी असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. मुख्य आरोपी नीतेश नवरखेडे रा. हिंगणघाट, दर्शन किन्नाके व पिकअप वाहनाचा चालकाविरुद्ध पोलीस स्टेशन चिमूर येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
ही कारवाई नेरी पोलीस चौकीच्या हद्दीतील गोरवात गाव परिसरात करण्यात आली.
बोलेरो पीकअप वाहनातून दारू तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती चिमूर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाला मिळाली होती. माहितीच्या आधारे जांभुळघाट ते नेरी रोडवर सापळा रचण्यात आला. पीकअप वाहनाच्या पाठीमागून येणाऱ्या दुसºया स्विफ्ट वाहनाने समोरील दारूने भरलेल्या पीकअप वाहनाचा पाठलाग केला. पोलिसांनी दारू पकडू नये, यासाठी लढवलेली ही युक्ती होती. यावेळी भरधाव कारने पथकातील वाहनास पीएससी चौक नेरी येथे ओव्हरटेक करून समोरून धडक दिली. घटनेची माहिती पोलीस स्टेशन चिमूरचे पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांना माहिती मिळताच ते आपल्या पथकासह तत्काळ घटनास्थळी रवाना झाले. अवैध दारू वाहतूक करणाºया पिकअप वाहनाचा शोध घेत असताना वाहन चालकाने दारूचा माल पकडल्या जाऊ नये म्हणून वाहन गोरवट ते मोटेगाव रस्त्याच्या बाजूचे शेत शिवारामध्ये लपवून ठेऊन पळ काढला. मात्र, पोलिसांच्या शोधमोहिमेत शेतात उभे ठेवलेले पीकअप वाहन दिसताच पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता देशीदारूच्या १३९ पेट्या आढळून आल्या. पोलिसांनी दारूसाठा आणि वाहन मिळून २० लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
सदर कार्यवाही चिमुरचे पोलीस निरीक्षक स्वप्निल धुळे, पोलीस उपनिरीक्षक किरण मेश्राम, पोलीस हवालदार विलास निमगडे, प्रवीण तिराणकर,पोलीस शिपाई कैलास आलाम, विनायक सरकुंडे, सुशील आठवले, सचिन खामनकर यांच्या पथकाने केली.

Web Title: Chimura confiscates Rs. 20,90,000 worth of indigenous liquor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.