चिमुरात भरवस्तीत धाडसी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 21:56 IST2018-11-11T21:55:37+5:302018-11-11T21:56:03+5:30
नेताजी वार्ड प्रभाग क्रमांक १० येथील इमरान इखलाख कुरेशी हे कुंटुबासोबत खरेदी करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी बाहेरगावी गेले होते. दरम्यान, रविवारी सांयकाळी घरी आले असता रोख १ लाख ७० हजार व सोन्याच्या अंगठ्या व सोन्याची साखळी अंदाजे असा एकून अडीच लाखांचा एवज लंपास अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे उघडकीस आले.

चिमुरात भरवस्तीत धाडसी चोरी
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : नेताजी वार्ड प्रभाग क्रमांक १० येथील इमरान इखलाख कुरेशी हे कुंटुबासोबत खरेदी करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी बाहेरगावी गेले होते. दरम्यान, रविवारी सांयकाळी घरी आले असता रोख १ लाख ७० हजार व सोन्याच्या अंगठ्या व सोन्याची साखळी अंदाजे असा एकून अडीच लाखांचा एवज लंपास अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे उघडकीस आले.
चिमूर नगरपरिषद क्षेत्रातील नेताजी वार्ड येथील अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष इमरान कुरेशी यांच्या लहान भावाचे लग्न असल्याने लग्नाच्या खरेदीकरिता गुरूवारी नागपुरला कुंटुबासोबत गेले होते. त्यामुळे घरी कुणीही नसल्याची संधी साधुन अज्ञात चोरट्यांनी दरवाज्याचे कुलुप रॉडने तोडून घरात प्रवेश केला. स्वंपाक घरात असलेल्या कपाटातुन अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे सभासद रक्कम तसेच रोख १ लाख २० हजार व सोन्याची अंगठी व चैन असा एकूण अडीच लाखांचा मुद्देमाल चोरून नेला. इमरान कुरेशी यांच्या पत्नी आज सांयकाळी चार वाजताच्या सुमारास खरेदी करून घरी आल्या असता चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
घटनेची माहिती मिळताच उपपोलीस निरीक्षक गणेश इंगोले घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनात करत आहेत. चिमूर पोलीस स्टेशन हद्दीत मागील दोन वर्र्षांपासून झालेल्या एकही चोरीच्या घटनेतील आरोपी गवसले नाहीत. त्यामुळे आरोपीला शोधण्याचे आव्हान पोलीस प्रशासनापुढे निर्माण झाले आहे.
त्यामुळे चिमूर शहरात झालेली चोरी पोलीस प्रशासनापुढे आव्हान आहे. तालुक्यात मागील आठवड्यात काही गावांमध्ये चोऱ्या झाल्या होत्या. दोन-तीन महिन्यांपासून भुरट्या चोरांचा शहरात धुमाकूळ सुरु आहे. दरम्यान नेताजी वॉर्डात चोरी झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भिती निर्माण झाली.