चिमूर भिसी बस नदिच्या पुलावरून घसरून अडकली, सात जणांचा जीव मुठीत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 23:26 IST2017-08-18T23:24:55+5:302017-08-18T23:26:29+5:30

चिमूर येथून भिसीला जाणारी बस क्रमांक एम् एच ४०एन ८९०३ ही बस आता ९:१५ मिनीटांनी पिपळनेरी येथील नदीवरील कठडे नसलेल्या पुलावरून पुढील चाके पुलाबाहेर गेले असून यात सिमेंट गोट्याना बस लडकून पडली आहे.

Chimur Bhisi bus fell down from the bridge of the bridge, seven people lost their lives | चिमूर भिसी बस नदिच्या पुलावरून घसरून अडकली, सात जणांचा जीव मुठीत 

चिमूर भिसी बस नदिच्या पुलावरून घसरून अडकली, सात जणांचा जीव मुठीत 

चंद्रपूर,  दि. 18 - चिमूर येथून भिसीला जाणारी बस क्रमांक एम् एच ४०एन ८९०३ ही बस आता ९:१५ मिनीटांनी पिपळनेरी येथील नदीवरील कठडे नसलेल्या पुलावरून पुढील चाके पुलाबाहेर गेले असून यात सिमेंट गोट्याना बस लडकून पडली आहे.  यात चार पुरुष व एक महिला प्रवाशांच्या सह चालक वाहक लटकून आत मध्ये आहेत.  सुदवाने कोणतीही जीवित व दुखापत हानी झाली नसली, तरी प्रवाशी जीव मुठीत घेऊन बस मध्येच आहे. तर बाहेर पाऊस सुरूच आहे  .
बसमधील प्रवाशी अरविंद राऊत यांनी सरदरच्या घटनेबाबतची माहिती बस स्थानकात दिली.  एसटी चालकामुळे मोठी दुर्घटना टळली आहे . याची माहिती बस स्थानक चिमूर व आगाराला दिली आहे. बसमधील प्रवासी मदतीच्या प्रतिक्षेक असून बसचा दरवाजा लॉक झाल्यामुळे त्यांना बाहेरही येता येत नाही.  मिळालेल्या माहितीनुसार चिमूर आगाराकडून दुसरी बस घटनास्थळाकडे पाठवण्यात आली आहे. 

Web Title: Chimur Bhisi bus fell down from the bridge of the bridge, seven people lost their lives