शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

बालोद्यानाला समस्यांचे ग्रहण

By admin | Updated: March 29, 2016 02:27 IST

येथील रेल्वे वसाहतीतील बालोद्यानाला अनेक समस्यांचे ग्रहण लागले आहे. रेल्वे प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने

नागभीड : येथील रेल्वे वसाहतीतील बालोद्यानाला अनेक समस्यांचे ग्रहण लागले आहे. रेल्वे प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने बालक व पालकांनी या बालोद्यानाकडे पाठ फिरविली आहे. यामुळे संबंधित बालोद्यानास बकालरूप प्राप्त होवून केवळ शोभेचे ठरले आहे. या बाबीकडे रेल्वे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.बालकांच्या विकासाकरिता रेल्वे प्रशासनाने सन २००४ मध्ये नागभीड (सुलेझरी) येथील रेल्वे वसाहतीत बालोद्यानाची निर्मिती केली. नागभीड शहरात व आसपासच्या परिसरात एकही बालोद्यान नसल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांच्या बालकांसहित रेल्वे प्रशासनाचे बालोद्यान इतरही बालकांचे आकर्षणाचे केंद्र ठरले. मात्र हे औटघटकेचे ठरले. बालोद्यानाची निर्मिती झाल्यापासून काही वर्ष रेल्वे प्रशासनाने व्यवस्थित देखभाल केली. परंतु, सद्यपरिस्थितीत या बालोद्यानाची रेल्वे प्रशासनाकडून देखभाल होत नसल्याने बकाल स्वरूप आले आहे. बालोद्यानाच्या मैदानात गवत व बाभळीची झाडे वाढली असून ठिकठिकाणी खड्डयांचे साम्राज्य आहे. यामुळे मुलांच्या अपघाताची शक्यता बळावली आहे. मुलांच्या खेळाचे विविध साहित्य तुटलेले असून बैठकीची लोखंडी बाके रंगरंगोटीअभावी गंजत आहेत. बालोद्यानातील विद्युत दिवे अनेक दिवसांपासून बंद असल्याने रात्रीच्या वेळी अंधार असते. (शहर प्रतिनिधी)रेल्वे स्थानकाचे सांैदर्यीकरण मात्र बालोद्यानाकडे दुर्लक्ष४एकीकडे रेल्वेस्थानकाच्या सौंदर्यीकरणाचे व विद्युतीकरणाचे काम प्रगतीपथावर असताना रेल्वे प्रशासनाचे अधिकारी बालोद्यानाच्या देखभालीकडे दुर्लक्ष करीत असल्याने याबाबत जनतेत आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. देखभालीअभावी संबंधीत बालोद्यान केवळ शोभेचे ठरले आहे. रेल्वे प्रशासनाने बालोद्यानाच्या समस्येकडे लक्ष देऊन बालोद्यानास नवसंजीवनी द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.