शहरं
Join us  
Trending Stories
1
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
2
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
3
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
4
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
5
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
6
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
7
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
8
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
9
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
10
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
11
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
12
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
13
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
14
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
15
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
16
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
17
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
18
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
19
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
20
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!

'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' स्पर्धा होणार; तिसऱ्या टप्प्याची घोषणा, राज्यभरातील शाळा पुन्हा सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 12:52 IST

Chandrapur : गतवर्षी पहिल्या सत्रातच या स्पर्धेची घोषणा झाली होती. यंदा ऑक्टोबर आला तरी या स्पर्धेची घोषणा न झाल्याने ती बंद पडली की काय अशी शंका उपस्थित होत होती.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्यातील शालेय शिक्षणात गुणवत्ता, नवचैतन्य आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-३' या स्पर्धात्मक अभियानाची घोषणा करण्यात आली आहे. उशिरा का होईना राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने यासंदर्भात अधिकृत शासन निर्णय जारी केला आहे. विशेष म्हणजे, पुढील वर्षात म्हणजे, फेब्रुवारी २०२६ मध्ये या स्पर्धेचा निकाल लागणार आहे.

गतवर्षी पहिल्या सत्रातच या स्पर्धेची घोषणा झाली होती. यंदा ऑक्टोबर आला तरी या स्पर्धेची घोषणा न झाल्याने ती बंद पडली की काय अशी शंका उपस्थित होत होती. या पार्श्वभूमीवर योजनेच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा झाली आहे. हे अभियान राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व प्रकारच्या शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये नवनवीन उपक्रमांसह राबविण्यात येणार आहे. यापूर्वी या योजनेचे टप्पा-१ (२०२३-२४) आणि टप्पा-२ (२०२४-२५) हे दोन्ही टप्पे यशस्वी ठरले होते. या स्पर्धेच्या माध्यमातून शाळांमध्ये लोकसहभाग वाढविण्यात आला होता.

पहिल्या टप्प्यात जवळपास २ कोटी विद्यार्थी सहभागी झाले होते. 'गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' मध्येही काही उपक्रमांची नोंद झाली होती. दुसऱ्या टप्प्यात राज्यभरातील हजारो शाळांनी सहभाग नोंदवला होता. विजेत्या शाळांना रोख पारितोषिक देऊन शाळांच्या गरजेनुसार त्याचा विनियोग करण्याची मुभा देण्यात आली होती. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती निर्माण करणे, त्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास साधणे आणि शिक्षण व्यवस्थेत सकारात्मक बदल घडवून आणणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे.

सहभागासाठी आवाहन

राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन शासनातर्फे करण्यात आले आहे. यामुळे शाळांना केवळ आर्थिक लाभच नाही तर एक सकारात्मक शैक्षणिक वातावरण तयार करण्यासही मदत होणार आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : 'Chief Minister My School, Beautiful School' competition announced; schools ready.

Web Summary : Maharashtra announces the third phase of 'Chief Minister My School, Beautiful School' competition for 2025-26. Aiming for quality education and holistic development, it encourages school participation, fostering a positive educational environment with potential rewards.
टॅग्स :Educationशिक्षणChief Ministerमुख्यमंत्रीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसzp schoolजिल्हा परिषद शाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्र