मुख्यमंत्री आज मूलमध्ये

By Admin | Updated: April 4, 2017 00:38 IST2017-04-04T00:38:54+5:302017-04-04T00:38:54+5:30

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या मंगळवारला चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. ते मूल येथे विविध विकास कामांचे लोकार्पण करणार आहेत.

Chief Minister is in the basics today | मुख्यमंत्री आज मूलमध्ये

मुख्यमंत्री आज मूलमध्ये

चंद्रपूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या मंगळवारला चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. ते मूल येथे विविध विकास कामांचे लोकार्पण करणार आहेत.
मुख्यमंत्र्यांचा हा शासकीय दौरा असून सकाळी ११ वाजता मूल येथील कर्मवीर महाविद्यालयाच्या हेलीपॅडवर त्यांचे आगमन होणार आहे. त्यानंतर डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालयाचे लोकार्पण, कर्मवीर मा. सा. कन्नमवार सांस्कृतिक सभागृहाचे लोकार्पण, दुपारी १२.१० वाजता जाहीर सभा होणार आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहणार आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Chief Minister is in the basics today