मनसे वीज संघटनेतर्फे मुख्य अभियंता सपाटे यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:42 IST2021-02-05T07:42:17+5:302021-02-05T07:42:17+5:30
चंद्रपूर: महानिर्मिती कंपनीच्या सर्वात मोठ्या चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले ...

मनसे वीज संघटनेतर्फे मुख्य अभियंता सपाटे यांचा सत्कार
चंद्रपूर: महानिर्मिती कंपनीच्या सर्वात मोठ्या चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे आयोजन करून १ हजार ३७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. याची दखल घेऊन चंद्रपूर वीज केंद्राचे मुख्य अभियंता तथा वर्धापन दिन समितीचे अध्यक्ष पंकज सपाटे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण वीज कामगार संघटनेच्या वतीने भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी वर्धापन दिन समितीचे सचिव सुहास जाधव व संयुक्त सचिव अभय मस्के यांचाही सत्कार करण्यात आला. या वेळी उपमुख्य अभियंता राजेश राजगडकर, राजेश ओसवाल, किशोर राऊत, मदन अहिरकर आणि सोमकुंवर यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी संघटनेचे केंद्रीय सरचिटणीस नरेंद्र रहाटे, देवराव कोंडेकर, नारायण चव्हाण, राजा वेमुला, सुजित जुनघरे, लक्ष्मण बोरकर, सुनील पाऊनकर आदींची उपस्थिती होती.