जय -पराजयाच्या गप्पांनी रंगू लागल्या गावचावडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:24 IST2021-01-02T04:24:40+5:302021-01-02T04:24:40+5:30
चंद्रपूर : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने ग्रामीण भागात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीत सक्रिय असणारे विविध ...

जय -पराजयाच्या गप्पांनी रंगू लागल्या गावचावडी
चंद्रपूर : ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने ग्रामीण भागात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीत सक्रिय असणारे विविध राजकीय पक्षांचे स्थानिक समर्थक प्रभागातील नागरिकांना भेटी देत आहेत. आपल्या उमेदवाराकडे लक्ष द्या, असे सांगत आहेत तर पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीतील जय-पराजयाच्या आठवणी गावचावडी बसून जुने हिशेब चुकते करण्याचे आडाखे बांधू लागले आहेत. यामुळे गावचावडीवर दररोज सकाळ-संध्याकाळ गप्पांचा फड रंगू लागला आहे. तरुणाईकडून सोशल मीडियाचा वापर करीत असल्याचे दिसून येत आहे.
जो उमेदवार गाव व प्रभागाच्या विकासाला न्याय देऊ शकतो, त्यांच्या पारड्यात मत टाकण्याचा विचार मतदार करीत आहेत. . सर्वसामान्य जनतेला आमिषे दाखवून मतदान आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. गावात मिळणाऱ्या मताधिक्यावरच गावापुढेºयांचे वजन ठरते. मात्र सोशल मीडियाचा वाढत्या वापरामुळे मतदार हुशार झाले. गावातील मतदान कमी जास्त झाले तर तालुका व जिल्ह्यातील नेत्यांसमोर आपले वजन कमी होईल, अशी भीती त्यांच्या मनात आहे.
मतदानाचा दिवस जवळ येईपर्यंत गावखेड्यांत अनेक घडामोडी होणार आहेत. निवडणुका आल्यानंतर जि. प. पंचायत समितीच्या राजकारणातील सक्रिय पुढारी गावात जाऊन लुडबूड करतात. गावातील मताधिक्य गाव पुढाऱ्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करीत असल्याने ग्रामपंचायत व्होट बँक टिकविण्यासाठी तेही सक्रिय झाले आहेत.