लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : येथील पोलीस दारूविक्रीविरूद्ध कारवाई करीत असताना काही दारूविके्रते गुंगारा देत कोणत्या ना कोणत्या मार्गाने दारू आणून विक्री करीत आहेत. त्यामुळे नागरिकांनी तक्रार करताच गुरुवारी रात्री पाठलाग करून दारू तस्कराला पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून विदेशी दारूसह ३ लाख ३७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीचे नाव शामराव कवडू उर्फ शामा मुळे असे आहे.शहरात नवीन दारू विक्रेते या व्यवसायात उतरले आहेत. हे विक्रेते पोलिसांच्या नजरेत न येता छुप्या मार्गाने चिमुरात दारू विक्री करीत आहेत. अशाच एका दारू तस्कराला पकडण्यासाठी चिमूर पोलिसांनी नवीन युक्ती लावून खासगी वाहनाचा वापर केला. एमएच ३४ एमएम ४३६१ क्रमांकाची कार चिमुरकडे जाताना पोलिसांनी पाठलाग सुरू केला. दरम्यान दारू तस्कर वाहन थांबवून अंधारातून पळाला. गाडीची तपासणी केली असता विदेशी दारूसह ३ लाख ३७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. मात्र आरोपी पळून गेल्याने सकाळी शोधाशोध सुरू करण्यात आली.वडाळा येथून श्यामराव कवडुउर्फ श्यामराव मुळे याला चिमूर याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अनुज तारे, पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश मोहोड, नापोशी किशोर बोढे, पोशी सचिन गजभिये, सतीश झिलपे, विजय उपरे आदींनी केली.
पाठलाग करून दारू तस्कराला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 05:01 IST
एका दारू तस्कराला पकडण्यासाठी चिमूर पोलिसांनी नवीन युक्ती लावून खासगी वाहनाचा वापर केला. एमएच ३४ एमएम ४३६१ क्रमांकाची कार चिमुरकडे जाताना पोलिसांनी पाठलाग सुरू केला. दरम्यान दारू तस्कर वाहन थांबवून अंधारातून पळाला. गाडीची तपासणी केली असता विदेशी दारूसह ३ लाख ३७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. मात्र आरोपी पळून गेल्याने सकाळी शोधाशोध सुरू करण्यात आली.
पाठलाग करून दारू तस्कराला अटक
ठळक मुद्देचिमूर पोलिसांची कारवाई : ३ लाख ३७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त