शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात बावनकुळेंच्या सभेत गोंधळ ! "मला साहेबांशी बोलायचे आहे" तिकीट नाकारलेला कार्यकर्ता पोहचला स्टेजवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 19:56 IST

Chandrapur : महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात भाजपमधील अंतर्गत असंतोष चंद्रपूरमध्ये उघडपणे समोर आला. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रचारसभांदरम्यान तिकीट नाकारलेल्या इच्छुकांनी दोन ठिकाणी थेट हस्तक्षेप केल्याने सभास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात भाजपमधील अंतर्गत असंतोष चंद्रपूरमध्ये उघडपणे समोर आला. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रचारसभांदरम्यान तिकीट नाकारलेल्या इच्छुकांनी दोन ठिकाणी थेट हस्तक्षेप केल्याने सभास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या घटनांमुळे भाजपमधील नाराजी अजूनही धगधगत असल्याचे स्पष्ट झाले.

सपना टॉकीज चौकातील सभेत भाजपकडून तिकीट नाकारलेले राकेश बोमनवार हे ना. बावनकुळे यांचे भाषण सुरू असतानाच "मला साहेबांशी बोलायचे आहे" म्हणत थेट व्यासपीठावर पोहोचले. अचानक घडलेल्या प्रकारामुळे क्षणभर गोंधळ उडाला. ना. बावनकुळे यांनी प्रसंगावधान राखत भाषण थांबवले आणि विनोदी टिप्पणी करत वेळ मारून नेली. मात्र, बोमनवार व्यासपीठावरून खाली उतरण्यास तयार नसल्याने आमदार किशोर जोरगेवार यांनी त्यांना खाली जाण्याचे सांगितले. अखेर कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप करत बोमनवार यांना सभास्थळाबाहेर नेले. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री डॉ. अशोक उईके व भाजप उमेदवार उपस्थित होते. उमेदवारीवरून सुरू झालेला भाजपातील नाराजीचा सूर आता प्रचारकाळातही कायम असल्यामुळे नेते चिंतित असल्याचे चित्र बघायला मिळाले.

नारेबाजी करणाऱ्यांना पोलिस ठाण्यात नेले

इंदिरानगर परिसरातील सभेतही असाच प्रकार घडला. तिकीट नाकारलेले मनोज पोतराजे आम आदमी पक्षाची मिरवणूक घेऊन घोषणाबाजी करत सभास्थळाकडे येत असल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी ना. बावनकुळे यांनी "हे आमचे काम नाही, पोलिस पाहतील," असे सूचक विधान केल्यानंतर पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्यांना तेथून हटवले. नंतर त्यांनी काहींना रामनगर पोलिस ठाण्यात नेण्यात आले. या दोन घटनांमुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपातील नाराजीची धग अद्याप शमलेली नसल्याचे स्पष्ट झाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Chandrapur: Chaos at Bawankule's meeting as ticket aspirant storms stage.

Web Summary : Uproar at Chandrapur BJP meeting as ticket denial fuels discontent. Rejected aspirants disrupted Revenue Minister Bawankule's rallies, voicing grievances and creating tense moments, highlighting ongoing internal party friction during election campaigning.
टॅग्स :Chandrapur Municipal Corporation Electionचंद्रपूर महानगरपालिका निवडणूक २०२६Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेElectionनिवडणूक 2026