शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
2
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
3
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
4
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
5
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
6
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
7
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
8
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
9
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
10
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
11
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
12
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
13
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
14
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
15
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
16
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
17
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका
18
“भाजपात संघटन चांगले, शिंदेसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही, त्यामुळे...”; हेमंत गोडसे थेट बोलले
19
"मुलींपासून दूर केलं, मला न सांगता..."; गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या पतीने मांडली व्यथा
20
२४० km रेंज अन् स्टायलिश लूक; लॉन्च झाली दमदार EV क्रूझर बाईक, किंमत फक्त सव्वा लाख...

Chandrapur Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात आणखी दोन जण ठार, एका महिन्यात ११ जणांचा मृत्यू; ग्रामस्थांमध्ये घबराट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 14:13 IST

Chandrapur Tiger Attack News: चंद्रपूर जिल्ह्यात मंगळवारी वाघांच्या हल्ल्याच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला.

चंद्रपूर जिल्ह्यात मंगळवारी वाघांच्या हल्ल्याच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. चंद्रपूर जिल्ह्यात या महिन्यात आतापर्यंत वाघाच्या हल्ल्यात ११ जण ठार झाले. वाघाच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीती पसरली असून  वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणीने जोर धरला.

महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी वाघाच्या हल्ल्यात दोन वेगवेगळ्या एक महिला आणि एका पुरूषाचा मृत्यू झाला. पहिली घटना चिचपल्ली वनक्षेत्रात घडली, जिथे मूल तहसीलमधील चिरोली गावातील रहिवासी नंदा संजय मकलवार (वय, ४५) सकाळी तिच्या पती आणि इतर काही लोकांसह लाकडी गोळा करण्यासाठी जंगलात गेल्या होत्या. त्यावेळी एका वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. दुसरी घटना दुपारी चिचपल्ली परिसरात घडली, जिथे कांतापेठ येथील रहिवासी सुरेश सोपानकर (वय, ५२) गुरे चरायला गेले असता वाघाने त्यांच्यावर हल्ला झाला, असे सांगण्यात आले.

या हल्ल्यांमुळे स्थानिक लोक घाबरले आहेत आणि प्रशासनाकडून कडक सुरक्षा व्यवस्था करण्याची मागणी केली जात आहेत. वन विभागाने लोकांना जंगलात एकटे न जाण्याचे आवाहन केले. मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यात या महिन्याच्या सुरुवातीपासून वाघाच्या हल्ल्यात एकूण ११ जणांचा मृत्यू झाला.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरTigerवाघMaharashtraमहाराष्ट्र