चंद्रपूर जिल्ह्यात दुकानदाराची दुकानातच गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 15:10 IST2020-05-05T15:10:33+5:302020-05-05T15:10:58+5:30
बल्लारपूर येथील टेकडी विभागातील कन्नमवार वॉर्डातील किराणा दुकानदार शिवअवतार सतनप्रसाद प्रजापति (५० वर्षे ) याने आपल्या दुकानात गळफास घेऊन आपली आत्महत्या केली.

चंद्रपूर जिल्ह्यात दुकानदाराची दुकानातच गळफास घेऊन आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : बल्लारपूर येथील टेकडी विभागातील कन्नमवार वॉर्डातील किराणा दुकानदार शिवअवतार सतनप्रसाद प्रजापति (५० वर्षे ) याने आपल्या दुकानात गळफास घेऊन आपली आत्महत्या केली.
मृतकाचे राहणे येथील कालरी भागातील सुभाष वॉर्डातील जोकू नाला परिसरात आहे. नेहमीप्रमाणे तो घरून दुकानात गेला होता. लॉकडाऊनमध्ये दुकान दुपारी २ वाजेपर्यंत उघडे ठेवता येते. त्यानंतर तो बराच वेळ झाला तरी घरी परत न आल्याने त्याची शोधाशोध करीत असताना तो आपल्या दुकानाचे आत गळफास लावून मृतावस्थेत आढळून आला. आत्महत्येचे कारण कळले नाही. पोलीस निरीक्षक एस. एस. भगत यांचे मार्गदर्शनात तपास सुरु आहे. आत्महत्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.