शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

चंद्रपूर एसडीओने काढली रेती तस्करांची वरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 12:57 PM

चंद्रपूर उपविभागीय अधिकारी रोहन घुगे यांनी गुरुवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास चक्क दुचाकीने आपल्या सहकाऱ्यांना घेऊन घुग्घुस नजीकच्या वर्धा नदीवरील घाटावर रेती खननामध्ये व्यस्त असलेल्या रेती तस्करांवर अचानक धाड घातली.

ठळक मुद्दे वर्धा नदीच्या घाटावर दुचाकीने धडक देत केले २४ ट्रॅक्टर जप्त

चंद्रपूर : चंद्रपूर उपविभागीय अधिकारी रोहन घुगे यांनी गुरुवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास चक्क दुचाकीने आपल्या सहकाऱ्यांना घेऊन घुग्घुस नजीकच्या वर्धा नदीवरील घाटावर रेती खननामध्ये व्यस्त असलेल्या रेती तस्करांवर अचानक धाड घातली. या धाडीत तब्बल २४ ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. जप्त केलेले ट्रॅक्टर घुग्घुस येथील तलाठी कार्यालयात आणताचे दृश्य एखाद्या वरातीसारखे भासत होते.

रेती घाटाचे लिलाव शासन व प्रशासनाने केले नाही. याचा पुरेपूर फायदा रेती तस्कर घेत आहेत. या तस्करांनी जिल्ह्यातील नद्यांचे पात्र अक्षरश: पोखरून टाकले आहे. मात्र महसूल विभाग आपले हात ओले करून काहीच माहिती नसल्याचे सोंग करून बसला होता. यामुळे रेती तस्कर कुणालाही जुमानत नव्हते. रेतीने भरलेले ट्रॅक्टर घुग्घुस पोलीस ठाण्यासमोरून जातानाही त्यांच्यावर कारवाई होत नव्हती. वास्तविक, पोलीस ठाण्यासमोर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यालाही हे रेती तस्कर जुमानत नव्हते. ‘लोकमत’ने बुधवारी ‘महसूल विभाग सुस्त : रेती तस्करीला ऊत’ अशा आशयाचे वृत्त प्रकाशित करताच महसूल विभागाची झोपच उडाली. उपविभागीय अधिकारी रोहन घुगे यांनी एका सहकाऱ्याला घेऊन दुचाकीने भल्या पहाटे थेट घुग्घुस परिसरातील वर्धा नदीचे रेतीघाट गाठले. सुरुवातीला रेती भरून जात असलेला एक ट्रॅक्टर त्यांनी पकडला. तो ताब्यात घेऊन त्याला रस्त्यावर आडवा केल्याने घाटातून रेती घेऊन येणाऱ्या अन्य ट्रॅक्टरचा रस्ताच बंद झाला. यानंतर येणारे ट्रॅक्टर त्यांनी ताब्यात घेणे सुरू केले. यानंतर घुगे यांनी आपल्या सहकाऱ्यांना कारवाईस्थळी बोलावून उर्वरित ट्रॅक्टरला नदी पात्रात जाऊन ताब्यात घेतले. अशाप्रकारे नीडरपणे २४ ट्रॅक्टरवर जप्तीची कारवाई करण्यात आली. जप्त केलेल्या ट्रॅक्टरला प्रत्येकी १ लाख १० हजार रुपये प्रमाणे दंड ठोठावला जाईल, असे उपविभागीय अधिकारी रोहन घुगे यांनी सांगितले. पुढील कारवाई सुरूच होती.

जिल्ह्यात रेती तस्करांचा धुमाकूळ

रेतीघाटाचे लिलाव न करणे म्हणजेच आपल्यासाठी रेतीघाट मोकळे असा अर्थ काढून काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून रेती तस्करांनी जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. ही बाब सर्व अधिकारी व त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांनाही चांगलीच ठाऊक आहे. परंतु आपल्याकडे तक्रारच नाही, असे सोईस्कर उत्तर देऊन मोकळे होण्यातच धन्यता मानण्याचा प्रकार सुरू आहे. रेती तस्करीमुळे शासनाचा कोट्यवधींचा महसूल डोळ्यादेखत बुडत आहे. हा महसूल सरकारी तिजोरीऐवजी विशिष्ट लोकांच्या थेट खिशात जात असल्याचे समजते.

गरिबांना घाटावर नो एन्ट्री

एखादा गरीब रेती घाटावर जावून आपल्या घरासाठी लागणारी रेती आणू शकत नाही. तस्करांनी रेतीघाटच बळकावून ठेवले आहे. अशा कारवाया झाल्यास ही दहशत संपुष्टात येईल. शिवाय शासनालाही कोट्यवधींचा महसूल मिळेल, असे बोलले जात आहे.

टॅग्स :sandवाळू