शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

प्रयत्न कमी पडल्यानेच चंद्रपूर प्रदूषित

By admin | Updated: June 5, 2014 23:53 IST

चंद्रपूरचे प्रदूषण देशपातळीवर पोहचले आहे. आपण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात कार्यरत असताना चंद्रपूरच्या प्रदूषणमुक्तीसाठी कृती आराखडा तयार केला. मात्र विकासाची गती

पत्रकार परिषद: दिलीप बोरलकर यांची माहितीचंद्रपूर : चंद्रपूरचे प्रदूषण देशपातळीवर पोहचले आहे. आपण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात कार्यरत असताना चंद्रपूरच्या प्रदूषणमुक्तीसाठी कृती आराखडा तयार केला. मात्र विकासाची गती आणि प्रदूषण नियंत्रणासाठी लागणारे इम्फ्रास्ट्रक्चर यांच्यातील वाढत जाणारी तफावत दूर करता आली नाही. शिवाय कृती आराखड्याच्या अंमलबजावणीचे प्रयत्नही तोकडे पडले. यामुळे चंद्रपूर प्रदूषणमुक्त होऊ शकले नाही, असे स्पष्टीकरण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे माजी सचिव डॉ. दिलीप बोरलकर यांनी केले. डॉ. बोरलकर हे एका कार्यक्रमासाठी आज गुरुवारी चंद्रपूरला आले होते. यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. डॉ. बोरलकर पुढे म्हणाले, एखादी समस्या निर्माण झाली की एकत्र येऊन त्याचा अभ्यास केला जातो. त्याचे सर्वेक्षण केले जाते. एक फाईल तयार होते. मात्र हा अहवाल मंत्रालयात पडून राहतो. प्रदूषणाची समस्या मोठी आहे. याचे दुष्परिणाम दुरगामी आहेत. त्यामुळे केंद्र, राज्य शासनाच्या प्रत्येक अधिकारी, कर्मचार्‍यांपासून सामान्य माणसांपर्यंत सर्वांनी अतिशय जलद गतीने प्रदूषणमुक्तीसाठी प्रयत्न केला पाहिजे. हैदराबादला चार हजार टन घनकचर्‍याची व्यवस्थित विल्हेवाट होते. मग चंद्रपुरात १३0 टन घनकचर्‍याची विल्हेवाट का होऊ शकत नाही, असा प्रश्नही त्यांनीच उपस्थित केला. प्लॅस्टिकचे प्रदूषण वाढत आहे. ही बाब धोकादायक आहे. प्लॅस्टिक निर्मुलनाची आज निकडीची गरज आहे. ५0 मायक्रॉनपेक्षा कमी प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी आहे. मात्र दुर्दैवाने ही बंदी पाळली जात नाही. या पिशव्या गोळा करणार्‍यांना विशेष आर्थिक फायदा होत नाही. त्यामुळे कुणीही त्या गोळा करीत नाही. पत्रकार परिषदेला आयएमएचे राज उपाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश टिपणीस, ग्रीन प्लॅनेटचे सुरेश चोपणे उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)