चंद्रपूर; घरात ठाण मांडलेला बिबट्या मध्यरात्री जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 10:44 IST2019-03-14T10:43:40+5:302019-03-14T10:44:07+5:30
नागभीड तालुक्यातील तळोधी(बा.) वनपरिक्षेत्रातील सावंगी या गावात बुधवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास एका बिबटाने थेट वाढई यांच्या घरात शिरून ठाण मांडले. या थरारक घटनेची अखेर गुरुवारी पहाटे ३.३० च्या सुमारास बिबट्याला जेरबंद करून झाली.

चंद्रपूर; घरात ठाण मांडलेला बिबट्या मध्यरात्री जेरबंद
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील तळोधी(बा.) वनपरिक्षेत्रातील सावंगी या गावात बुधवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास एका बिबटाने थेट वाढई यांच्या घरात शिरून ठाण मांडले. या थरारक घटनेची अखेर गुरुवारी पहाटे ३.३० च्या सुमारास बिबट्याला जेरबंद करून झाली. मात्र या घटनेने संबंधित कुटुंबीयांसह गावकरी चांगलेच हादरले आहेत. घटनेची माहिती होताच तळोधी वनपरिक्षेत्राधिकारी अभिलाषा सोनटक्के यांनी गावकऱ्यांना हिम्मत कायम ठेवण्याच्या सूचना केल्या. यानंतर त्या आपल्या सुमारे १० कर्मचाऱ्यांना घेऊन घटनास्थळाकडे रवाना झाल्या. हा बिबट घरातील माळावर जाऊन बसल्याने त्याला तेथे बेशुद्ध करणे किंवा पिंजऱ्यात अडकवणे यासाठी वनकर्मचाऱ्यांना बरीच कसरत करावी लागणार होती. ज्या घरात तो दडला होता त्याची कौले काढून त्याला हुसकावण्याचेही प्रयत्न करण्यात आले. या भागात वीज पुरवठा नसल्याने ही सर्व कारवाई बॅटरीच्या उजेडात करण्यात आल्याचे सांगितले जाते. अखेर पहाटे ३.३० च्या सुमारास हा बिबट वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद झाला आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.