शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

६० वर्षानंतर चंद्रपूरला मिळाल्या दुसऱ्या महिला खासदार

By परिमल डोहणे | Updated: June 5, 2024 17:39 IST

Chandrapur : १९५१ पासून १२ महिलांनी लढवली लोकसभा निवडणूक

चंद्रपूर : मंगळवारी लागलेल्या लोकसभेच्या निकालात प्रतिभा धानोरकर यांनी सुधीर मुनगंटीवार यांचा दोन लाख ६० हजार ४०६ मतांनी पराभव करून विधानसभेपाठोपाठ लोकसभेत एन्ट्री केली आहे. लोकसभेच्या आजपर्यंतच्या इतिहासात दिल्ली गाठणाऱ्या त्या दुसऱ्या महिला ठरल्या आहेत. यापूर्वी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. मारोतराव कन्नमवार यांच्या पत्नी ताई कन्नमवार यांनी १९६४ च्या पोटनिवडणुकीत विजय मिळविला होता. तब्बल ६० वर्षांनंतर प्रतिभा धानोरकर यांच्या रूपाने दुसरी महिला खासदार चंद्रपूरला मिळाल्या आहेत.

भारत स्वतंत्र झाल्यानंतर सन १९५१ ला संपूर्ण देशभरात पहिला लोकसभा निवडणूक झाली. तेव्हापासून चंद्रपूर लोकसभेत १२ महिलांनी निवडणूक लढवली आहे. यामध्ये १९६४, १९६७ मध्ये ताई कन्नमवार, १९८९, १९९१ मध्ये ज्येष्ठ गौरी भवसार, १९९६, १९९८ मध्ये सत्यशीला रायपुरे यांनी दोनदा निवडणूक लढवली आहे, तर १९८० मध्ये प्रतिमा नुरुद्दीन, १९८४ जयश्री इंगळे, १९८९ उर्मिला पाठक, १९९१ वीरा सिर्गेवार, १९९९ शोभा पोटदुखे, २००४ तायरा शेख, २०२४ मध्ये प्रतिभा धानोरकर, पौर्णिमा घोनमोडे, वनिता राऊत यांनी निवडणुका लढवल्या आहेत. यापैकी १९६४ च्या पोटनिवडणुकीत ताई कन्नमवार, तर २०२४ च्या निवडणुकीत प्रतिभा धानोरकर यांनी विजय मिळविला आहे. 

अशी झाली पोटनिवडणूक१९६२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत लाल शामशहा यांनी ५ सप्टेंबर १९६२ रोजी खासदारकीची शपथ घेतली. मात्र, त्यांनी २४ एप्रिल १९६४ ला राजीनामा दिला. या रिक्त झालेल्या जागेवर त्याचवर्षी पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत ताई कन्नमवार या चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या पहिल्या महिला खासदार म्हणून निवडून आल्या.

आजपर्यंतचे खासदार

१९५१ मुल्ला अब्दुलभाई ताहेर अली (भाराकाँ)१९५७ व्ही. एन. स्वामी (भाराकाँ)

१९६२ लाल शामशहाला भगवानशाहा (अपक्ष)१९६४ ताई कन्नमवार (भाराकाँ) (पोटनिवडणूक)

१९६७ के. एम. कौशिक (अपक्ष)१९७१ अब्दुल शफी (भाराकाँ)

१९७७ राजे विश्वेश्वरराव (बीएलडी)१९८० शांताराम पोटदुखे (भाराकाँ)

१९८४ शांताराम पोटदुखे (भाराकाँ)१९८९ शांताराम पोटदुखे (भाराकाँ)

१९९१ शांताराम पोटदुखे (भाराकाँ)१९९६ हंसराज अहीर (भाजपा)

१९९८ नरेश पुगलिया (भाराकाँ)१९९९ नरेश पुगलिया (भाराकाँ)

२००४ हंसराज अहिर (भाजपा)२००९ हंसराज अहिर (भाजपा)

२०१४ हंसराज अहिर (भाजपा)२०१९ बाळू धानोरकर (भाराकाँ)

२०२४ प्रतिभा धानोरकर (भाराकाँ)

 

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४chandrapur-acचंद्रपूरSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारMaharashtraमहाराष्ट्र