Chandrapur: सिंदेवाही तालुक्यात मृतावस्थेत आढळला हत्ती
By राजेश भोजेकर | Updated: October 3, 2023 09:42 IST2023-10-03T09:42:13+5:302023-10-03T09:42:39+5:30
Elephant found dead: सिंदेवाही ते मूल मार्गावरील राजोली गावापासून आत सुमारे ६ किमी अंतरावरील जंगल परिसरात असलेल्या चिटकी शिवारात मंगळवारी सकाळी जंगली हत्ती मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Chandrapur: सिंदेवाही तालुक्यात मृतावस्थेत आढळला हत्ती
- राजेश भोजेकर
चंद्रपूर : सिंदेवाही ते मूल मार्गावरील राजोली गावापासून आत सुमारे ६ किमी अंतरावरील जंगल परिसरात असलेल्या चिटकी शिवारात मंगळवारी सकाळी जंगली हत्ती मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. हत्तीचा मृत्यू नेमका कशाने झाला हे स्पष्ट झालेले नसले तरी हत्ती ज्या भागात आढळला त्या परिसरात धानाची (भाताची) शेती आहे. या पिकाला वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी कीटकनाशके फवारणी केली असल्याचे बोलले जात आहे. हे पीक खाल्ल्याने विषबाधा होऊन या हत्तीचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज बांधला जात आहे.