चंद्रपूर जिल्ह्यात सौर ऊर्जेच्या विद्युत प्रवाहाने दुचाकी जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 11:44 IST2020-05-14T11:44:10+5:302020-05-14T11:44:29+5:30
चंद्रपूर जिल्ह्यात सौर ऊर्जेच्या विद्युत प्रवाहाने दुचाकी जळून खाक झाल्याची घटना घडली.

चंद्रपूर जिल्ह्यात सौर ऊर्जेच्या विद्युत प्रवाहाने दुचाकी जळून खाक
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चिमूर तालुक्यातील सावरी (बिड) येथे खानगाव ते सावरी रोड लगत तुळशीराम आवारी यांच्या शेतात विद्युत महावितरण कंपनीचे रोहीत्र (ट्रान्सफार्मर) आहे. तसेच त्यांच्या शेतात भाजीपाला लागवड असल्यामुळे जनावंरापासून बचावाकरिता सौर ऊर्जेचे कुंपण लावले आहे. गावातील विद्युत बंद पडल्यामुळे वायरमन मेश्राम विद्युत दुरस्तीकरिता दुचाकीने शेतातील रोहीत्राकडे जात असताना त्यांची दुचाकी कुंपणाच्या ताराला धडकली, कुंपणाचा तार बारीक असल्यामुळे तो त्यांना दिसून पडला नाही. ताराला दुचाकीची धडक बसताच तारामधून स्पार्क निघाला व लगेच दुचाकीने पेट घेतला. त्यात दुचाकी जळून खाक झाली. यामध्ये वायरमन मेश्राम थोडक्यात बचावले.