चंद्रपूरला वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 05:58 IST2018-06-18T05:58:37+5:302018-06-18T05:58:37+5:30

लाडबोरी गावात पट्टेदार वाघाने शेतात काम करणाऱ्या वनिता आनंदराव चौके (५०) यांच्यावर रविवारी दुपारी केलेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.

Chandrapur dies of death of woman in Tangra | चंद्रपूरला वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

चंद्रपूरला वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

सिंदेवाही (चंद्रपूर) : लाडबोरी गावात पट्टेदार वाघाने शेतात काम करणाऱ्या वनिता आनंदराव चौके (५०) यांच्यावर रविवारी दुपारी केलेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. सिंदेवाही वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्याची ही सातवी घटना आहे.
चौके कुटुंबाला वन विभागाने २५ हजार रुपयांची मदत दिली आहे. शनिवारी किन्ही येथे वाघाच्या हल्ल्यात एक व्यक्ती जखमी झाला होता. सलग दुसºया दिवशी या परिसरात वाघाने हल्ला केला. सध्या शेतात मशागतीचे काम सुरू असून वाघाच्या हल्ल्यांमुळे शेतकºयांमध्ये दहशत आहे. नोव्हेंबरपासून आतापर्यंत वाघाच्या हल्ल्यात सात जणांचा मृत्यू झाला आहे. वाघाने १२ जनावरे फस्त केली आहेत.

Web Title: Chandrapur dies of death of woman in Tangra