शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

Chandrapur: क्रिकेट खेळताना झाला वाद; डोक्यावर मारली बॅट, अल्पवयीन मुलाचा मृत्यू

By परिमल डोहणे | Updated: June 7, 2023 20:41 IST

Chandrapur: क्रिकेट खेळत असताना अल्पवयीन मुलांत वाद झाला. रागाच्या भरात एका मुलाने बॅटने दुसऱ्या मुलाच्या डोक्यावर जोरदार वार केला. परिसरातील नागरिकांनी लगेच त्याला चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले.

- परिमल डोहणेचंद्रपूर - क्रिकेट खेळत असताना अल्पवयीन मुलांत वाद झाला. रागाच्या भरात एका मुलाने बॅटने दुसऱ्या मुलाच्या डोक्यावर जोरदार वार केला. परिसरातील नागरिकांनी लगेच त्याला चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र दोन दिवसानंतर त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत मुुलाच्या आईच्या तक्रारीवरुन शहर पोलिसांनी कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. फैजान अखिल शेख (१२) रा. बगडखिडकी असे मृत मुलाचे नाव आहे.

३ जून रोजी चंद्रपूर बगडखिडकी परिसरातील मस्जिदशेजारील मैदानावर १० ते १५ वर्षांखालील मुले क्रिकेट खेळत होते. क्रिकेट खेळत असताना त्या मुलांमध्ये वाद झाला. यावेळी एका अल्पवयीन मुलाने रागाच्या भरात फैजान शेखच्या डोक्यावर बॅटने जोरदार वार केला. परिसरातील नागरिकांनी त्याला चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु, याबाबत त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांना कोणतीही माहिती दिली नाही. दरम्यान ५ जून रोजी फैजानचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत शहर पोलिसांना कुणकुण लागली होती. त्यातच मृत मुलाच्या आईने चंद्रपूर शहर पोलिस स्टेशन गाठून तक्रार केली. पोलिसांनी मंगळवारी कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शहर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक अतुल स्थुल करीत आहेत.

शवविच्छेदनासाठी दफन केलेला मृतदेह काढलाउपचारादरम्यान ५ जून रोजी फैजानचा मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबीयांनी याबाबत पोलिसात कोणतीही तक्रार न करता त्याच्या पार्थिवावर दफनविधी केली. मंगळवारी फैजानच्या आईने चंद्रपूर शहर पोलिस स्टेशन गाठून घटनेची तक्रार केली. मात्र मृतदेह दफन केला असल्याने पोलिसांनी परवानगी घेऊन दफन केलेला मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर बुधवारी शवविच्छेदन करण्यात आले.

टॅग्स :Deathमृत्यूMaharashtraमहाराष्ट्र