चांदा फोर्ट-जबलपूर सुपरफास्ट रेल्वे गाडीला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 05:00 IST2021-03-10T05:00:00+5:302021-03-10T05:00:47+5:30

चंद्रपूर जिल्ह्याचे जबलपूर, बालाघाट शहराशी औद्योगिक संबंध आहेत. व्यावसायिक, औद्योगिक व सर्वसामान्य नागरिकांना त्या दोन्ही शहरात ये-जा करण्यासाठी चांदा फोर्ट ते जबलपूर सुपरफास्ट गाडीची अत्यंत आवश्यकता होती. यासंदर्भात माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनीही रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला. त्यामुळे मंगळवारी या गाडीचे चांदा फोर्टवर आगमन झाले.

Chanda Fort-Jabalpur Superfast train starts | चांदा फोर्ट-जबलपूर सुपरफास्ट रेल्वे गाडीला सुरूवात

चांदा फोर्ट-जबलपूर सुपरफास्ट रेल्वे गाडीला सुरूवात

ठळक मुद्देनवीन गाडीमुळे साडेआठ तासात गाठता येणार जबलपूर

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शहर व जिल्ह्यातील उद्योजकजगत व प्रवाशांना थेट जबलपूर, बालाघाट शहरात जाण्यासाठी चांदा फोर्ट ते जबलपूर सुपरफास्ट गाडी सुरू करण्यात आली. मंगळवारी दुपारी १. ४५ वाजता या गाडीचे चांदा फोर्टवर आगमन होताच चंद्रपूर रेल सुविधा संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांनी लोको पायलटला पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
चंद्रपूर जिल्ह्याचे जबलपूर, बालाघाट शहराशी औद्योगिक संबंध आहेत. व्यावसायिक, औद्योगिक व सर्वसामान्य नागरिकांना त्या दोन्ही शहरात ये-जा करण्यासाठी चांदा फोर्ट ते जबलपूर सुपरफास्ट गाडीची अत्यंत आवश्यकता होती. यासंदर्भात माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनीही रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला. त्यामुळे मंगळवारी या गाडीचे चांदा फोर्टवर आगमन झाले. यावेळी चंद्रपूर रेल्वे सुविधा संघर्ष समितीचे पुनम तिवारी, खुशाल बोंडे, माजी उपमहापौर अनिल पुलझेले, भाजप महानगर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, डॉ. भुपेश भलमे, रमेश बोथरा, संदीप आगलावे, नगरसेविका ज्योती गेडाम, श्याम कनकम, प्रदीप किरमे, नरेश लेखवानी आदी उपस्थित होते.
 

असे आहे वेळापत्रक
चंद्रपूर ते जबलपूर व्हाया नागपूर, इटारसी जावे लागत होते. त्यामुळे १२ तासांचा वेळ जायचा. नवीन गाडीमुळे केवळ साडेआठ तासात जबलपूरला जाता येणार आहे. ही गाडी दर मंगळवार, गुरूवार व शुक्रवारी चांदा फोर्टवर दुपारी १. ४५ वाजता येईल. भविष्यात या गाडीचा थांबा मूल, मारोडा, नागभीड, वडसा व सौंदड स्थानकावर देण्यात येणार आहे.

 

Web Title: Chanda Fort-Jabalpur Superfast train starts

टॅग्स :railwayरेल्वे