चंद्रपूर-ताडोबा राज्य महामार्गावर भगदाड पडल्याने अपघाताची शक्यता

By Admin | Updated: August 18, 2015 01:12 IST2015-08-18T01:12:56+5:302015-08-18T01:12:56+5:30

पद्मापूर कोळसा खाणीजवळून नुकताच वळविण्यात आलेल्या चंद्रपूर-ताडोबा राज्य महामार्गावर एक मोठे भगदाड पडले

Chance on the Chandrapur-Tadoba State Highway | चंद्रपूर-ताडोबा राज्य महामार्गावर भगदाड पडल्याने अपघाताची शक्यता

चंद्रपूर-ताडोबा राज्य महामार्गावर भगदाड पडल्याने अपघाताची शक्यता

चंद्रपूर-ताडोबा राज्य महामार्गावर भगदाड पडल्याने अपघाताची शक्यता
दुर्गापूर : पद्मापूर कोळसा खाणीजवळून नुकताच वळविण्यात आलेल्या चंद्रपूर-ताडोबा राज्य महामार्गावर एक मोठे भगदाड पडले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत तयार करण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे येथे अपघात घडण्याची शक्यता बळावली आहे. वेळीच जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
पद्मापूर खुल्या कोळसा खाणीच्या विस्ताराकरिता मोरघाट नाल्यापासून ताडोबा मार्ग वळविण्यात आला आहे. या मार्गाचे सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधकाम केले. याला केवळ दोन वर्षाचाच अवधी झाला आहे.
या अल्पशा अवधीतच या मार्गाचा निकृष्ट दर्जा समोर आला आहे. येथे गत दोन दिवसांपासून तुरळक पाऊस सुरू आहे. या पावसाच्या पाण्यामुळे पद्मापूर कोळसा खाणीच्या सेक्टर-४ जवळ ताडोबा राज्य महामार्गावर एक खोल भगदाड पडले आहे. त्या लगतचा मार्गही कमकुवत झाला आहे. तेथे परत असे मोठे भगदाड पडून खोल खड्डा तयार होण्याची शक्यता आहे. दिवसा हे भगदाड स्पष्ट दिसत आहे. मात्र अंधाऱ्या रात्री येथे केव्हाही अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. (वार्ताहर)

Web Title: Chance on the Chandrapur-Tadoba State Highway