घुग्गुसवासींच्या मनातील प्रेमाची खुर्ची महत्त्वाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:40 IST2021-02-05T07:40:59+5:302021-02-05T07:40:59+5:30
रविवारी घुग्गुस येथे भाजप महिला आघाडीतर्फे आयोजित मकरसंक्रांती व सांस्कृतिक महोत्सवात ते बोलत होते. यावेळी भाजप महिला मोर्चा ...

घुग्गुसवासींच्या मनातील प्रेमाची खुर्ची महत्त्वाची
रविवारी घुग्गुस येथे भाजप महिला आघाडीतर्फे आयोजित मकरसंक्रांती व सांस्कृतिक महोत्सवात ते बोलत होते.
यावेळी भाजप महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उमा खापरे, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले, भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, प्रदेश उपाध्यक्ष वनिता कानडे, सरचिटणीस अश्विनी जिचकार, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अलका आत्राम, माजी महापौर अंजली घोटेकर, विवेक बोढे, नामदेव डाहुले, उपमहापौर राहुल पावडे आदी उपस्थित होते.
आमदार मुनगंटीवार म्हणाले, स्रीशक्तीचा पराक्रम, स्रीशक्तीचे संस्कार हे भारतीय संस्कृतीचे बलस्थान आहे. स्री तेजस्विनी, शक्तिदायिनी आहे. वीरांगना झाशीची राणी लक्ष्मीबाई, राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर अशा थोर महिलांचा वारसा आम्हाला लाभला आहे. संचालन किरण बोढे यांनी केले. आयोजनासाठी पूजा दुर्गम, अर्चना भोंगळे, वैशाली ढवस, सुचिता लुटे, कुसुम सातपुते, वसुधा भोंगळे, सुनीता पाटील, सारिका भोंगळे, लक्ष्मी नलभोगा, नंदा कांबळे आदींनी सहकार्य केले.