चंद्रपुरात सेवालाल महाराज जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:17 IST2021-02-22T04:17:00+5:302021-02-22T04:17:00+5:30

चंद्रपूर : संत सेवालाल महाराज यांची २८२ वी जयंती येथील नगरसेवक सुभाष कासनगोट्टुवार यांच्या विशेष प्रयत्नातून सौंदर्यीकरण केलेल्या वसंतराव ...

Celebration of Sewalal Maharaj Jayanti at Chandrapur | चंद्रपुरात सेवालाल महाराज जयंती साजरी

चंद्रपुरात सेवालाल महाराज जयंती साजरी

चंद्रपूर : संत सेवालाल महाराज यांची २८२ वी जयंती येथील नगरसेवक सुभाष कासनगोट्टुवार यांच्या विशेष प्रयत्नातून सौंदर्यीकरण केलेल्या वसंतराव नाईक चौकात प्रा. विश्वनाथ राठोड यांच्या पुढाकाराने साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाचे उदघाटन चंद्रपूर महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती रवी आसवानी यांच्या हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी प्रदेश अध्यक्ष अशोक राठोड तर प्रमुख पाहुणे म्हणून जनजागृती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तुकाराम पवार, मुक्ती फाऊंडेशनच्या अध्यक्ष मंजुश्री कासनगोट्टूवार, पुरणसिंग चव्हाण, इंजि. संजय राठोड, नवनाथ गायकवाड आदी उपस्थित होते. प्रा. विश्वनाथ राठोड यांनी प्रास्ताविकातून संत सेवालाल महाराजांचे जीवनचरित्र, उपदेश याबाबत माहिती दिली. तुकाराम पवार यांनी वसंतराव नाईकांचा पूर्णाकृती पुतळा चंद्रपूर येथे उभारण्याकरिता प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, रवी आसवानी यांनी मार्गदर्शन केले. मंजुश्री कासनगोट्टूवार यांचा विशेष ----पामळी------- पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. इंजि. संजय राठोड यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी माया मंदाडे, अनिता राठोड, उमा राठोड, शांताबाई राठोड, वसंराव धंदरे, जिलानी जाधव, चव्हाण, चौबे. जोगी, इंजि. अडकिने, प्रा. संजय पवार, पुरणसिंग चव्हाण, विठ्ठल जाधव उपस्थित होते. आभार मुर्लीधर राठोड व प्रा. संजय पवार यांनी मानले.

Web Title: Celebration of Sewalal Maharaj Jayanti at Chandrapur