शेतकऱ्यांची संस्कृती जपणारा उत्सव पोळा
By Admin | Updated: September 3, 2016 00:37 IST2016-09-03T00:37:21+5:302016-09-03T00:37:21+5:30
भारत हा संस्कृतीप्रधान देश असून शेतकऱ्यांची संस्कृती जपणारा उत्सव पोळा सण आहे.

शेतकऱ्यांची संस्कृती जपणारा उत्सव पोळा
हंसराज अहीर यांचे प्रतिपादन : कढोली येथे पोळा उत्सव साजरा
राजुरा : भारत हा संस्कृतीप्रधान देश असून शेतकऱ्यांची संस्कृती जपणारा उत्सव पोळा सण आहे. राबराब राबणारा शेतकरी वर्षभर काबाडकष्ट केल्यानंतर वर्षांतून एकदा मोठ्या उत्साहात ग्रामीण भागात पोळा उत्सव साजरा केला जाते. केंद्र सरकारही देशातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अनेक योजना कार्यान्वित करून शेतकऱ्यांचा सर्वांगिण विकासासाठी झटत आहे, शेतकऱ्यांनी केंद्राच्या योजनां लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
राजुरा तालुक्यातील कढोली येथे आयोजित बैलजोडी सजावट स्पर्धेप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी प्रामुख्याने राजुराचे आमदार अॅड. संजय धोटे, तहसीलदार धर्मेश फुसाटे, उपविभागीय पोलीस अधिकारी शेखर देशमुख, भाजपाा नेते विनायक देशमुख, वाघु गेडाम, भाऊराव चंदनखेडे, भाजपा सरचिटणीस अरुण मस्की, राजू घरोटे, कढोलीचे सरपंच रसिका पडवेकर, उपसरपंच सुभाष झाडे, ग्रा. पं. सदस्य दिलीप बोबडे, देवेंद्र उपरे, संगीता पायपरे, प्रतिभा हिंगाणे, पुरुषोत्तम हिंगाणे, मधूकर पायपरे, राजु उरकुडे, मनोहर जेणेकर, राकेश हिंगाणे उपस्थित होते.
स्वर्गीय कालीदास अहीर स्मृती प्रित्यर्थ आयोजित बैलजोडी सजावट स्पर्धेचे प्रथम पारितोषिक आनंदराव झाडे यांच्या बैलजोडीने पटकाविले. द्वितीय आनंद बोबडे, तृतीय घनश्याम हिंगाणे, चतुर्थ दत्तु हिंगाणे यांनी पटकाविला. कढोली येथील पोळा उत्सवात मोठ्या थाटात बैलजोड्या सजावट करून सहभागी झाले होते.
यावेळी इतर मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. अशोक आस्वले यांचा बैल वीजपडून मरण पावल्याने त्याला अनुदान म्हणून २५ हजाराचा धनादेश ना. हंसराज अहीर, आमदार अॅड. संजय धोटे यांच्या हस्ते देण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका महामंत्री घरोटे यांनी केले. संचालन भाजपा राजुरा तालुका अध्यक्ष सुनील उरकुडे यांनी तर आभार पुरुषोत्तम हिंगाणे यांनी मानले. याप्रसंगी कार्यक्रमाला कढोली येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)