सीबीसीएस पद्धतीमधून रोजगाराची संधी मिळते

By Admin | Updated: August 29, 2016 01:24 IST2016-08-29T01:24:13+5:302016-08-29T01:24:13+5:30

विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी मिळावी, या उद्देशाने विद्यापीठाने सीबीसीएस ही विद्यार्थी केंद्रीत प्रक्रिया अंमलात आणली आहे.

CCCS offers employment opportunities | सीबीसीएस पद्धतीमधून रोजगाराची संधी मिळते

सीबीसीएस पद्धतीमधून रोजगाराची संधी मिळते

कुलगुरूंचे प्रतिपादन : प्राध्यापकांची एक दिवसीय कार्यशाळा
सावली : विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी मिळावी, या उद्देशाने विद्यापीठाने सीबीसीएस ही विद्यार्थी केंद्रीत प्रक्रिया अंमलात आणली आहे. त्यामध्ये आवडीनुसार अभ्यासक्रमाची निवड करता येणार आहे. त्यातून भविष्यात या पद्धतीचा विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार असल्याचे मत गोंडवाना विद्यापीठाचे कुुलगुरु डॉ. कल्याणकर यांनी व्यक्त केले.
गोंडवाना विद्यापीठ इंग्रजी प्राध्यापक संघटना आणि गोंडवाना विद्यापीठ इंग्रजी विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोेजित ‘सीबीसीएस अभ्यासक्रमाची रचना’ या विषयावर आयोजित एक दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी कुलगुरु डॉ. कल्याणकर बोलत होते. गोंडवाना विद्यापीठाच्या सभागृहात झालेल्या कार्यशाळेला वनश्री महाविद्यालय कोरची येथील प्राचार्य डॉ. निमसरकर, विद्यापीठाच्या इंग्रजी अभ्यासमंडळाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अरुण प्रकाश, गोंडवाना विद्यापीठ इंग्रजी प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.ए. चंद्रमौली उपस्थित होते.
प्रारंभी कुलगुरु डॉ. कल्याणकर यांच्या हस्ते गोंडवाना विद्यापीठ इंग्रजी प्राध्यापक संघटनेच्या चिन्हाचे अनावरण करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ.निमसरकार यांनी सीबीसीएस पद्धतीचे फायदे सांगताना अध्यापन आणि अध्ययन पद्धतीच्या अनुषंगाने आयोजित होणाऱ्या कार्यशाळा, चर्चासत्र आणि परिषदांमध्ये सहभागी होवून प्राध्यापकांनी स्वत:ला अद्यावत करून घेण्याचे आवाहन केले.
कुलगुरु डॉ.कल्याणकर यांनी चॉईस बेस क्रेडीट सिस्टीम म्हणजे सीबीसीएस असल्याचे सांगून या पद्धतीचा जास्तीत जास्त अवलंब व्हावा यासाठी प्राध्यापकांनी सहकार्य करावे, अशी विनंती केली.
उद्घाटन कार्यक्रमाचे संचालन संघटनेचे सचिव डॉ. श्रीराम गहाणे यांनी तर आभार डॉ. निकिता मिश्रा यांनी मानले. कार्यशाळेच्या प्रथम सत्रामध्ये डॉ.अमोल पदवाड यांनी चाईस बेस क्रेडीट सिस्टीमचे गुण व त्यासमोरील आव्हाने यासंबंधी मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ.चंद्रमौली यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रथम सत्राचे संचालन डॉ.बेन्नी यांनी तर प्रा.इमॅन्युल कोंड्रा यांनी आभार मानले.
दुसऱ्या सत्रात विद्यापीठाच्या इंग्रजी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अरुण प्रकाश आणि पदव्युत्तर विभागाचे इंग्रजी प्रमुख डॉ.विवेक जोशी यांनी सीबीसीएस अभ्यासक्रमाची माहिती दिली. एफईएस महाविद्यालय चंद्रपूरचे प्रा. डॉ. मुकुंद देशमुख अध्यक्षस्थानी होते. प्रा. मिनाक्षी जुमडे यांनी संचालन आणि डॉ. अक्षय धोटे यांनी आभार मानले.
कार्यशाळेच्या खुल्या सत्रामध्ये सहभागी प्राध्यापकांनी सीबीसीएस अभ्यासक्रमातील चुका आणि सुधारणा यावर चर्चा घडवून आणताना अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करताना विद्यापीठाकडून अपेक्षा व्यक्त केल्या.
डॉ. ख्वाजा मोईनुद्दीन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यशाळेच्या खुल्या सत्राचे संचालन प्रा.सूर्यतले यांनी तर डॉ.खामनकर यांनी आभार मानले. यावेळी अनेक प्राध्यापकांची उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: CCCS offers employment opportunities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.