सावधान, २४ तासात ३३ बाधितांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:29 IST2021-04-22T04:29:43+5:302021-04-22T04:29:43+5:30
१५७७ नवीन पॉझिटिव्ह आढळले. संसर्गवेग झपाट्याने वाढल्याने अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १३ हजार १७३ पर्यंत पोहोचली. उपचारानंतर आज ५७८ तर ...

सावधान, २४ तासात ३३ बाधितांचा मृत्यू
१५७७ नवीन पॉझिटिव्ह आढळले. संसर्गवेग झपाट्याने वाढल्याने अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १३ हजार १७३ पर्यंत पोहोचली. उपचारानंतर आज ५७८ तर आतापर्यंत ३२ हजार ६०२ कोरोनामुक्त झाले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ४६ हजार ४४६ वर पोहोचली आहे. सध्या १३ हजार १७३ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ३ लाख ४१ हजार ४०४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २ लाख ८८ हजार ३६१ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ६७१ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ६२१, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली २२, यवतमाळ २१, भंडारा तीन, गोंदिया एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे. कोरोना संसर्ग वाढतच आहे. त्यामुळे स्वत:ची काळजी घ्यावी. ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
असे आहेत मृत
चंद्रपूर बालाजी वाॅर्ड येथील ६६ वर्षीय महिला, तुकूम येथील ५४ वर्षीय पुरुष, ५२ वर्षीय महिला, २६ वर्षीय पुरुष, जलनगर वाॅर्ड येथील ५० वर्षीय व ७५ वर्षीय महिला, बाबुपेठ येथील ५१ वर्षीय पुरुष, घुग्गुस येथील ६७ वर्षीय पुरुष, तर नागभीड येथील ८० वर्षीय पुरुष, ब्रह्मपुरी तालुक्यातील कुरझा येथील ६० वर्षीय पुरुष, हनुमान नगर येथील ५४ वर्षीय पुरुष, तोरगाव येथील ६० वर्षीय पुरुष, कलेता येथील ५७ वर्षीय महिला, पेठ वाॅर्ड येथील ५० वर्षीय महिला, चांदली येथील ४५ वर्षीय पुरुष, कोथुळना येथील ३८ वर्षीय पुरुष, गांधीनगर येथील ५७ वर्षीय महिला, ३५ व ४५ वर्षीय पुरुष. चिमूर तालुक्यातील नेरी येथील ५८ वर्षीय पुरुष, भिसी येथील ५५ वर्षीय पुरुष, बल्लारपूर येथील ७२ वर्षीय पुरुष, ५५ वर्षीय पुरुष, भद्रावती तालुक्यातील संताजी नगर येथील ८५ वर्षीय पुरुष, श्रीराम नगर येथील ३५ वर्षीय व ६९ वर्षीय पुरूष, वरोरा तालुक्यातील ७७ वर्षीय पुरूष, माढेळी येथील ६० वर्षीय पुरुष, अलीनगर येथील ६६ वर्षीय पुरुष, नरेंद्र्र प्रताप नगर येथील ६७ वर्षीय महिला, गडचांदूर येथील ५० वर्षीय महिला, राजुरा तालुक्यातील चुनाळा येथील ७० वर्षीय पुरुष, गोंडपिपरी तालुक्यातील चेक बोरगाव येथील ६५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
तालुकानिहाय बाधित
चंद्रपूर मनपा क्षेत्र ४६५
चंद्रपूर तालुका ६८
बल्लारपूर १३१
भद्रावती १३६
ब्रह्मपुरी ५९
नागभीड ४०
सिंदेवाही २४
मूल ३०
सावली ०८
पोंभूर्णा ०४
गोंडपिपरी १७
राजूरा ५०
चिमूर २२६
वरोरा १२७
कोरपना १४७
जिवती २०
इतर २५