चिमूर तालुक्यातील खटले वरोरा तालुक्यात

By Admin | Updated: August 31, 2015 00:52 IST2015-08-31T00:52:08+5:302015-08-31T00:52:08+5:30

चिमूर तालुक्यात समावेश असलेल्या व शहरापासून १५ ते २० किमी अंतरावर असलेल्या १० ते १२ गावांचा समावेश वरोरा तालुक्यातील शेगाव पोलीस ठाण्यात आहे.

The cases in Chimur taluka are in Warora taluka | चिमूर तालुक्यातील खटले वरोरा तालुक्यात

चिमूर तालुक्यातील खटले वरोरा तालुक्यात

खडसंगी : चिमूर तालुक्यात समावेश असलेल्या व शहरापासून १५ ते २० किमी अंतरावर असलेल्या १० ते १२ गावांचा समावेश वरोरा तालुक्यातील शेगाव पोलीस ठाण्यात आहे. त्यामुळे तालुका एक आणि खटला दुसऱ्याच तालुक्यात, अशा स्थितीमुळे चिमूर तालुक्यातील गावकऱ्यांना आर्थिक, मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
चिमूर तालुक्यात ९८ ग्रामपंचायती असून २३० गावांचा समावेश आहे. या गावांसाठी चिमूर व भिसी पोलीस ठाणे आहेत. चिमूर तालुक्यातील सोनेगाव (वन), आमडी, रेगांबोडी, सावरी, खातगाव, भिवकुंड, खापरी यासह १० ते १२ गावांचा समावेश वरोरा तालुक्यातील शेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आला आहे. या गावापासून चिमूर तालुका ठिकाण २० ते ३० किमी अंतरावर आहे. त्यामुळे चिमूर पोलीस ठाणे सोयीचे ठरते. मात्र या गावांचा समावेश ४० ते ५० किमी दूर अंतरावर असलेल्या शेगाव पोलीस ठाण्यात असल्याने गावातील नागरिकांना एखादी तक्रार दाखल करण्यासाठी शेगाव पोलीस ठाण्यात जावे लागते. यासाठी नागरिकांना आर्थिक व शारिरीक त्रास सहन करावा लागत आहे. या गावांचा चिमूर पोलीस ठाण्यात समावेश करण्यासाठी अनेकदा गृहविभागाकडे मागणी करण्यात आली आहे. (वार्ताहर)
सर्वच सेवा एका ठिकाणी देण्यात याव्या
चिमूर तालुक्यातील दहा ते १२ गावांचा समावेश शेगाव पोलीस ठाण्यात येत आहे. त्यामुळे गुन्हा चिमूर तालुक्यातील तर खटला वरोरा तालुक्यातील न्यायालयात चालतो. त्यामुळे सर्व सेवा एकाच तालुक्यात देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Web Title: The cases in Chimur taluka are in Warora taluka