शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

प्राध्यापिकेच्या तक्रारीवरून चंद्रपूर जिल्ह्यात दोन प्राचार्यांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2021 7:00 PM

Chandrapur News बीआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राचार्य व पॉलिटेक्निकचे प्राचार्य यांच्याविरुद्ध एका प्राध्यापिकाने विनयभंग व जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार केली. तक्रारीवरून दोन्ही प्राचार्यांविरुद्ध बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देबीआयटी अभियांत्रिकी महाविद्यालय व पॉलिटेक्निकचे दोन्ही प्राचार्य

चंद्रपूर : केम तुकूम येथील आदिवासी मुलींचे लैंगिक शोषण प्रकरण ताजे असतानाच बामणी येथील बीआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राचार्य व पॉलिटेक्निकचे प्राचार्य यांच्याविरुद्ध एका प्राध्यापिकाने विनयभंग व जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार केली. तक्रारीवरून दोन्ही प्राचार्यांविरुद्ध बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (A case of molestation has been registered against two principals in Chandrapur district on the complaint of a professor)

६ ऑक्टोबरला बीआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य रजनीकांत मिश्रा व पॉलिटेक्निकचे प्राचार्य श्रीकांत गोजे (रा. बल्लारपूर) यांनी महाविद्यालयातील मायनिंगच्या विभाग प्रमुखाच्या प्राध्यापिकेशी विद्यार्थ्यांना आमच्याविरोधात भडकावतात यावरून भांडण केले व या भांडणात दोन्ही प्राचार्यांनी प्राध्यापिकेचा हात ओढला व विनयभंग केला, असा आरोप प्राध्यापिकेतर्फे केला आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार न देण्याची समज इतर स्टाफतर्फे प्राध्यापिकेला देण्यात आली व त्यांना आपल्या गावी पाठविण्यात आले.

त्यानंतरही प्राचार्यातर्फे अश्लील मॅसेज आणि जीवे मारण्याची धमकी देणे सुरू होते, असे प्राध्यापिकेने म्हटले आहे. शेवटी १७ ऑक्टोबरला प्राध्यापिकेने दोन्ही प्राचार्यांविरुद्ध बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे तक्रार केली. दोन्ही प्राचार्यांविरुद्ध विनयभंग व जीवे मारण्याच्या धमकीअंतर्गत भादंवि ३५४, ३५४ (अ), ३५४(अ)(१)(आय)३५४(ब), ३५४(५), ५०६,५०९,३२३ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नाही. पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय प्रमोद रासकर करीत आहेत.

टॅग्स :Molestationविनयभंग