ट्रॅव्हल्सला धडक देत कॅप्सुल टँकर वेल्डिंग वर्कशॉपमध्ये घुसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:28 IST2021-03-16T04:28:36+5:302021-03-16T04:28:36+5:30

वरोरा : वरोरा ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या नंदोरी येथील बस स्थानकाजवळ भरधाव वेगात येत असलेल्या कॅप्सुल टँकरने डीएनआर कंपनीच्या ट्रॅव्हल्सला ...

The capsule tanker entered the welding workshop, hitting the travels | ट्रॅव्हल्सला धडक देत कॅप्सुल टँकर वेल्डिंग वर्कशॉपमध्ये घुसला

ट्रॅव्हल्सला धडक देत कॅप्सुल टँकर वेल्डिंग वर्कशॉपमध्ये घुसला

वरोरा : वरोरा ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या नंदोरी येथील बस स्थानकाजवळ भरधाव वेगात येत असलेल्या कॅप्सुल टँकरने डीएनआर कंपनीच्या ट्रॅव्हल्सला धडक देत दुभाजक ओलांडून वेल्डिंगच्या दुकानात घुसला. यात वेल्डिंग दुकानाचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. वेल्डिंग दुकानातील कामगारांनी तत्परता दाखवीत पळ काढल्याने मोठी दुर्घटना टळली.

प्राप्त माहितीनुसार, चंद्रपूरवरून नागपूरकडे जाणारा कॅप्सुल टँकर क्रमांक एमएच ०४ एम ७९५९ हा भरधाव वेगात येत असल्याने चालकाचे नियंत्रण सुटून चंद्रपूरवरून नागपूरकडे जाणाऱ्या डीएनआर कंपनीच्या ट्रॅव्हल्सला धडकला. यानंतर दुभाजक ओलांडून थेट उमरे वेल्डिंग वर्कशॉपमध्ये घुसला. त्या वे‌ळी वेल्डिंग वर्कशॉपमध्ये चार कामगार काम करीत होते. मात्र, कामगारांनी तत्परता दाखवीत तिथून पळ काढला. यामुळे मोठी दुर्घटना टळली. वेल्डिंग वर्कशॉपचे मालक किशोर उमरे यांचे एक लाख पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले. डीएनआर कंपनीच्या ट्रॅव्हल्सचेही मोठे नुकसान झाले आहे.

कॅप्सुल टँकर चालक राहुल गौतम वाघमारे (४५, रा. घुटकाला वॉर्ड चंद्रपूर) याला वरोरा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील चौकशी पोलीस करीत आहेत. नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रवी खाडे यांनी केली आहे.

Web Title: The capsule tanker entered the welding workshop, hitting the travels