तेलंगणातून चंद्रपुरात येतो गांजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 05:00 IST2020-12-21T05:00:00+5:302020-12-21T05:00:42+5:30

घराची झडती घेतली असता, भींतीलगत गाद्याच्या मागे  दोन निळ्या रंगाच्या व एक पांढऱ्या रंगाची प्लास्टिक बोरी आढळून आली.  त्याला उघडून बघितले असता त्यामध्ये  खाकी कागदाच्या चौकोनी आकारात पॅक केलेले व प्लास्टिक दोरीने बांधून ओलसर पाने, फुले, व देठ हिरवट रंगाची ६९ किलो १८५ ग्रॉम वनस्पती आढळून आली. यावेळी पोलिसांनी गांजा व सर्व मुद्देमाल असा एकूण १० लाख ४१ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Cannabis comes to Chandrapur from Telangana | तेलंगणातून चंद्रपुरात येतो गांजा

तेलंगणातून चंद्रपुरात येतो गांजा

ठळक मुद्देराजुरा येथे एलसीबीची धाड : ७० किलो गांजा जप्त, चार अटकेत

  लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : दारुबंदीनंतर जिल्ह्यात आम्लपदार्थांच्या सेवनाचे प्रमाण वाढत आहे. आम्लपदार्थाची तस्करी रोखण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करीत आहे. शनिवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला तेलंगणातून तस्करी केलेल्या गांजाची विक्री होणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राजुरा येथील शिवाजी नगरातील सतीश तेलजिलवार याच्या घरी धाड टाकून आठ लाख ३० हजार २२० रुपये किंमतीचा ६९ किलो १८५ ग्राॅम उग्र वास असलेला ओला गांजा व इतर साहित्य असा एकूण  दहा लाख ४१ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन चार जणांना अटक केली. 
सतीश मुंडी उर्फ मोंडी तेलजिरवार (२२) रा. सोडो, ता. राजुरा, सुनील दादाजी मडावी (३८) रा. गडचांदुर, नजिरशहा शहेनशहा (४५) गडचांदुर, पुरुषोत्तम किष्टया जंजीर्ला (५७) रा. धोपटाळा ता. राजुरा असे अटकेतील आरोपींचे नाव आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी करण्यात आली. अनेकांनी पर्याय म्हणून गांजाचे सेवन सुरु केले. त्यामुळे जिल्ह्यात गांजा तस्करी वाढली आहे. शनिवारी तेलंगणातून तस्करी केलेल्या गांजाची राजुरा येथे विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. 
या माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राजुरा येथील सतीश तेलजिलवार यांच्या घरी धाड टाकली. 
यावेळी घराची झडती घेतली असता, भींतीलगत गाद्याच्या मागे  दोन निळ्या रंगाच्या व एक पांढऱ्या रंगाची प्लास्टिक बोरी आढळून आली.  त्याला उघडून बघितले असता त्यामध्ये  खाकी कागदाच्या चौकोनी आकारात पॅक केलेले व प्लास्टिक दोरीने बांधून ओलसर पाने, फुले, व देठ हिरवट रंगाची ६९ किलो १८५ ग्रॉम वनस्पती आढळून आली. यावेळी पोलिसांनी गांजा व सर्व मुद्देमाल असा एकूण १० लाख ४१ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली.  ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरिक्षक संदीप कापडे, उपनिरीक्षक जितेंद्र बोबडे, पद्माकर भोयर, नितीन जाधव, राजेंद्र खनके, पंडित वऱ्हाडे, राजकुमार देशपांडे, मिलिंद चव्हाण, अनुप डांगे, जमीर पठाण, सुरेंद्र महतो, मनोज रामटेके, नितेश महात्मे, शेखर आसुटकर, जावेद सिद्दीकी, नितीन रायपुरे आदींनी केली.

Web Title: Cannabis comes to Chandrapur from Telangana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.