शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
2
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
3
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
4
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
5
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
6
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
7
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
8
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
9
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
10
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
11
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
12
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
13
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
14
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
15
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
16
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...
17
राहुल गांधींचे आव्हान भाजपने स्वीकारले; खुल्या चर्चेसाठी 'या' नेत्याची केली निवड...
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
RR ला मोठा धक्का; स्टार खेळाडूची IPL 2024 मधून माघार, Play Off ची जागा पक्की होण्यापूर्वी झटका
20
Dust Storm: मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प

अजेंडा पोहचविण्यासाठी उमेदवारांचा आटापिटा, झेलत आहे ऊन, वारा अन् पावसाचा मारा

By साईनाथ कुचनकार | Published: April 13, 2024 2:58 PM

प्रचारासाठी अवघे चार दिवसच शिल्लक असल्याने ऊन असो की पाऊस, कोणत्याही स्थितीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी जीवाची पर्वा न करता कार्यकर्ते कामाला लागले आहेत.

चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदार संघात पहिल्या टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. त्यामुळे सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सभा, बैठका, प्रचारदौरे आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच काही दिवस तप्त उन्हात घामाच्या धारांमध्ये प्रचार केल्यानंतर आता अकाली पावसामध्ये भिजून प्रचार करण्याची वेळ उमेदवारांसह त्यांच्या कार्यकर्त्यांवर आली आहे. प्रचारासाठी अवघे चार दिवसच शिल्लक असल्याने ऊन असो की पाऊस, कोणत्याही स्थितीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी जीवाची पर्वा न करता कार्यकर्ते कामाला लागले आहेत.

चार दिवसांपूर्वी जिल्ह्याचे तापमान ४२ अंशापर्यंत पोहोचले होते. त्यामुळे प्रचार करताना उमेदवारांसह त्यांच्या कार्यकर्त्यांना चांगलाच घाम सुटला होता. दुपारच्या वेळी प्रचार करताना चांगलीच दमछाक होत होती. मात्र आता वातावरणात बदल झाला आहे. ऊन-सावलीचा खेळ सुरू असतानाच ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी पावसानेही हजेरी लावली आहे. गुरुवार, शुक्रवारी काही ठिकाणी तर शनिवारी पहाटे विजांच्या कडकडाटांसह पाऊस कोसळला. दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यामुळे वातावरण बदलले तरीही आपला अजेंडा मतदारांपर्यंत पोहोचावा, म्हणून उमेदवार ऊन, वारा अन् पाऊस या तिन्ही स्थितीचा सामना करीत प्रचाराला लागले आहेत.वातावरणाच्या बदलामुळे निवडणुकीच्या नियोजनाचे मात्र तीन तेरा वाजू लागले आहेत. मुळातच प्रचाराला वेळ कमी असताना बदलत्या वातावरणामुळे उमेदवार व त्यांचे समर्थक कमालीचे त्रस्त झाले आहेत.

१५ उमेदवार रिंगणात

चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात सहा विधानसभा आणि १६ तालुक्यांचा समावेश आहे. विस्ताराने मोठे असलेल्या या क्षेत्रामध्ये विविध राजकीय पक्षांसह १५ उमेदवार रिंगणात आहेत. प्रमुख पक्षांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली असून काहींचे तर अजूनही मतदारांना नाव किंवा चिन्ह सुद्धा माहीत नसल्याची स्थिती आहे.

चार दिवसांपूर्वी पारा ४२ अंशावर

सर्वाधिक उष्ण शहरामध्ये राज्यातच नाही तर देशात चंद्रपूरचे नाव आहे. मार्च महिन्यापासूनच ऊन तापायला लागले. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये तर पारा ४२ अंशापर्यंत पोहचला होता. त्यामुळे उन्हाच्या झळा नागरिकांना बसल्या. दरम्यान, आता ढगाळ वातावरण तसेच अकाली पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

टॅग्स :chandrapur-pcचंद्रपूरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४