शहरं
Join us  
Trending Stories
1
Lokmat Exclusive: ठाकरे मुंबई नक्कीच गमावतील, महापालिकांमध्ये निवडणुकोत्तर नवीन समीकरणे: CM देवेंद्र फडणवीस
2
आजचे राशीभविष्य : शुक्रवार ९ जानेवारी २०२६; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
3
९ वर्षांत ७५ हजार कोटी खर्च केले तर मग विकास कुठे?: अजितदादांचा भाजपा नेत्यांना थेट सवाल
4
तू तिच्या गाडीला अपघात कर, मी तिला वाचवतो...; तरुणीला इम्प्रेस करण्याचा प्लॅन, सफलही झाला पण...
5
“स्वत:च्या भरवशावर बहुमत मिळवू; परंतु साथीदारांना सोडणार नाही”; CM फडणवीस यांचा टॉक शो
6
ठाकरेंच्या गुहेत एकनाथ शिंदे यांची कठीण परीक्षा; भाजपा मदतीने तगडे आव्हान पार केले तर...
7
आंदोलकांचा इराणच्या राजधानीवर कब्जा! रात्रीच्या अंधारात सरकारी कार्यालये ताब्यात, तेहरानने हवाई क्षेत्र बंद केले...
8
“सत्ताधाऱ्यांची हुकूमशाही, मी पाहिलेली आजवरची ही सर्वांत घाणेरडी निवडणूक”: अमित ठाकरे
9
…तर अमेरिका भारतावर ५०० टक्के टॅरिफ लादणार; डोनाल्ड ट्रम्प प्रशासन धक्का देण्याच्या तयारीत
10
ममतांच्या ‘वॉर रूम’वर ईडीचा पहाटे ६ वाजता छापा; प्रशांत किशोर स्थापित ‘आयपॅक’वर धाडी
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टार्गेटवर पुन्हा एकदा भारत; अमेरिका आंतरराष्ट्रीय सौर आघाडीतूनही बाहेर
12
महायुतीने चार प्रभाग निवडणुकीआधीच गमावले; बंडखोरीची केली चिंता, पण बसला मोठा फटका
13
काँग्रेस-वंचित युतीकडे ३६ जागांवर उमेदवारच नाही; काँग्रेसकडे २०, वंचितकडे १६ उमेदवारांचा अभाव
14
कोणाचे डिपॉझिट होणार जप्त? ९ पालिकांच्या तिजोरीत २ कोटी ६२ लाख जमा; मुंबईत १७०० उमेदवार
15
महायुतीत १५३ कोट्यधीश उमेदवार, चंदन शर्मा सर्वात श्रीमंत; सोनाली जाधवांकडे फक्त ४४ हजार
16
माजी आमदार, महापौरांच्या संपत्तीत झाली लक्षणीय वाढ; मालमत्तेचा विषय चर्चेचा ठरतोय
17
४ उमेदवारांनी निवडला समाजसेवा ‘व्यवसाय’; शिक्षणासह व्यावसायिक पार्श्वभूमीचे चित्र स्पष्ट
18
कार्यकर्त्यांना नाष्ट्याला कुठे तर्रीदार मिसळ-पाव, तर कुठे जिलेबी, फाफडा; दोन्ही वेळेला जेवणही!
19
महापालिका निवडणूक क्षेत्रात १५ जानेवारीला सुट्टी; राज्य सरकारकडून अधिसूचना जारी
20
महायुद्धाचे संकेत? 'या' २१ देशात प्रवास करू नका; अमेरिकन नागरिकांसाठी Travel Advisory जारी
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर मनपा संकेतस्थळावर अपलोडच झाले नाही उमेदवारांचे शपथपत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 19:56 IST

गतिमान प्रशासनावर प्रश्नचिन्ह : परिशिष्ट एकमध्ये नाही उमेदवारांच्या मालमत्तेची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सर्वोच्च न्यायालयाने २ मे २००२ रोजी निर्णयानुसार, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची माहिती मतदारांना उपलब्ध होणे, हा मतदारांचा मूलभूत हक्क असल्याचे स्पष्ट केले. ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व गतिमान करण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा आदेश आहे. मात्र, चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक प्रशासनाकडून रिंगणातील संपूर्ण ४५१ उमेदवारांची शपथपत्र सोमवारी (दि. ५) रात्री १० वाजेपर्यंत अपलोड झालेली नाहीत. काही अपलोड झालेल्या शपथपत्रातील परिशिष्ट- १मध्ये उमेदवारांच्या स्थावर व जंगम मालमत्तेची नोंद नाही. त्यामुळे नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिवाणी अपील क्रमांक ७१७८/२००१, दि. २ मे २००२मध्ये दिलेल्या निर्णयानुसार, निवडणूक लढविणाऱ्या सर्व मेदवारांकडून त्यांच्या शैक्षणिक पात्रता, मालमत्ता व देणी तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी याबाबतचे शपथपत्र घेणे बंधनकारक आहे.

शपथपत्राचा नमुना निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सुधारित केला आहे. त्यानुसार प्राप्त परिशिष्ट- १मधील शपथपत्रातील माहिती प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. मतदारांना उमेदवारांविषयी संपूर्ण व सत्य माहिती उपलब्ध झाल्यास ते सूज्ञ, स्वतंत्र व जबाबदार निर्णय घेऊ शकतात. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी उमेदवारांकडून शपथपत्राद्वारे माहिती घेऊन सार्वजनिक करणे आवश्यक आहे. मनपा प्रशासनाने न्यायालय निर्णयाच्या अधीन राहून परिशिष्ट-१ मधील काही शपथपत्रांतील माहिती संकेतस्थळावर अपलोड केली. मात्र, या शपथपत्रांत मालमत्ता, देणी, व्यवसाय, उत्पन्न या महत्त्वपूर्ण बाबींची नोंद केलेली नाही.

परिशिष्ट-१ मध्ये कोणती माहिती आहे?

संकेतस्थळावर काही अपलोड शपथपत्रांमधील परिशिष्ट-१मध्ये वैयक्तिक माहिती, प्रभाग क्रमांक व अनुक्रमांक, शिक्षण, शैक्षणिक अर्हता, अपत्ये, गुन्हेगारी, न्यायालयीन प्रकरणे, राजकीय पक्षांच्या उमेदवारीसाठी नावे कळविण्याचे लेखी सूचनापत्र, मतपत्रिकेत नाव छापण्याबाबत नमुना १५ अशी माहिती आहे. मात्र, उमेदवारांची स्थावर व जंगम मालमत्ता तसेच कर्जाची माहिती, या परिशिष्ट-१मध्ये नाही.

अंतिम मतदारांची वॉर्डनिहाय यादी अपलोड

राज्य निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर झाल्यापासून चंद्रपूर महानगर पालिकेने आजवर सर्व माहिती संकेतस्थळावर अपलोड केली आहे. निवडणूक चिन्हांचे घोषणापत्र, नामांकनपत्रांची माहिती, प्रभागरचना, संभाव्य दुबार नावे व अंतिम मतदारांची वॉर्डनिहाय यादीही तेथे उपलब्ध आहे. यासाठी संबंधित यंत्रणेने रात्रंदिवस काम केल्याचे सांगितले जाते. मात्र, शपथपत्रांबाबत विलंब झाल्याने नागरिक विचारणा करू लागले आहेत.

"निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांची शपथपत्र महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर अपलोड करण्याचे काम सुरू होईल. ही पूर्णतः तांत्रिक प्रक्रिया आहे. अपलोड झालेले शपथपत्र २ मे २००२च्या न्यायालयीन निर्णयानुसार आहेत."- अकुनुरी नरेश, आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी मनपा, चंद्रपूर

English
हिंदी सारांश
Web Title : Chandrapur Municipal Corporation fails to upload candidate affidavits online.

Web Summary : Chandrapur Municipal Corporation failed to upload candidate affidavits by the deadline. Required asset details are missing from uploaded documents, raising concerns about transparency despite other election information being available online. Officials say upload ongoing.
टॅग्स :Chandrapur Municipal Corporation Electionचंद्रपूर महानगरपालिका निवडणूक २०२६Electionनिवडणूक 2026Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग