रोटरी क्लबतर्फे कर्करोग शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:28 IST2021-03-31T04:28:34+5:302021-03-31T04:28:34+5:30
चंद्रपूर : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटीच्या वतीने डॉ. शर्मिली पोद्दार यांच्या रुग्णालयात कर्करोग ...

रोटरी क्लबतर्फे कर्करोग शिबिर
चंद्रपूर : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटीच्या वतीने डॉ. शर्मिली पोद्दार यांच्या रुग्णालयात कर्करोग तपासणी शिबिर नुकतेच पार पडले. या शिबिरात अनेक महिलांची तपासणी करण्यात आली. यावेळी महिलांना मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिरामध्ये डॉ. शर्मिला पोद्दार यांनी महिलांची तपासणी केली. तसेच महिलांना स्तन व गर्भाशयाचा कर्करोग होण्याची कारणे, उपाययोजना व घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन करताना कर्करोगाची लक्षणे सांगून, अशी लक्षणे दिसताच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेण्याचे आवाहन केले. यावेळी महिलांनी विचारलेल्या प्रश्नांचे निरसण केले. याप्रसंगी क्लबच्या फाऊंडर अध्यक्ष विद्या बांगडे, क्लबच्या अध्यक्ष रमा गर्ग, सचिव पूनम कपूर, शकुंतला गोयल, शाहिन शफिक, दुर्गा पोटुदे, कल्पना गुप्ता आदी उपस्थित होते. यावेळी क्लबच्या अध्यक्ष रमा गर्ग यांनी उपस्थितांचे आभार मानले.