राष्ट्रीयकृत बँकेत उमेदवारांचे खाते उघडण्याची अट रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:27 IST2020-12-22T04:27:59+5:302020-12-22T04:27:59+5:30
मागणी : घुग्घुस : चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारांची लगबग सुरू ...

राष्ट्रीयकृत बँकेत उमेदवारांचे खाते उघडण्याची अट रद्द करा
मागणी :
घुग्घुस : चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारांची लगबग सुरू आहे. परंतु ग्रामपंचयत निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारांना लागणाऱ्या कागदपत्रात नवीन राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडण्याची अट ठेण्यात आली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात राष्ट्रीयकृत बँकाची शाखा त्यामुळे इच्छुकांना बॅंकेत खाते काढण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे बँकेत उमेदवारांची मोठी गर्दी होते. ही अट रद्द करण्यात यावी, अशी चंद्रपूर किसान काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात निवडणूक विभागाला निवेदन देण्यात आले आहे.
शिष्टमंडळात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनेशभाऊ चोखारे, संचालक चंद्रकांत गुरु, चंद्रपूर किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष रोशन पाचारे, माजी सरपंच गणेश आवरी, माजी उपसपंच चंदू माथने, माजी ग्रामपंचयत सदस्य सुबोध कासवटे, काँग्रेस नेते योगेश ठाकरे आदी उपस्थित होते.