चंद्रपुरात मद्यधुंद बसचालकाने दिली ऑटोरिक्शाला धडक; दोन गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 14:25 IST2019-06-07T14:23:32+5:302019-06-07T14:25:59+5:30
चंद्रपूर शहरातील बायपास मार्गावर शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास एका बसने ऑटोला मागून धडक दिल्याने ऑटो जागीच उलटला. यामध्ये ऑटोमधील चालक व १ सहकारी गंभीर जखमी झाले आहेत.

चंद्रपुरात मद्यधुंद बसचालकाने दिली ऑटोरिक्शाला धडक; दोन गंभीर
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शहरातील बायपास मार्गावर शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास एका बसने ऑटोला मागून धडक दिल्याने ऑटो जागीच उलटला. यामध्ये ऑटोमधील चालक व १ सहकारी गंभीर जखमी झाले आहेत.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास एका बसने ऑटोला मागून धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की ऑटो हा जागीच पलटी झाला. बसमधील चालक हा दारू पिऊन बस चालवीत होता असे लक्षात आले. जेव्हा तो चालक बस खाली उतरला तर त्याला चालणं पण कठीण झालं होतं. शासकीय कर्तव्यावर असे दारू पिऊन वाहन चालविणे व बसमध्ये लोकांचा जीव मुठीत घेऊन चालणे हे कितपत योग्य आहे? असा सवाल उपस्थित नागरिकांनी केला आहे.