वरोरात भरदिवसा घरफोडी; सहा तोळे सोने व दीड लाख लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:59 IST2021-09-02T04:59:45+5:302021-09-02T04:59:45+5:30

वरोरा शहरातील शिवाजी वाॅर्डातील राम मंदिराजवळ मारुती शंकर कुत्तरमारे हे दुपारी दीडच्या सुमारास आपल्या घराला कुलूप लावून मुलावर उपचार ...

Burglary all day in Warora; Six ounces of gold and one and a half lakh lampas | वरोरात भरदिवसा घरफोडी; सहा तोळे सोने व दीड लाख लंपास

वरोरात भरदिवसा घरफोडी; सहा तोळे सोने व दीड लाख लंपास

वरोरा शहरातील शिवाजी वाॅर्डातील राम मंदिराजवळ मारुती शंकर कुत्तरमारे हे दुपारी दीडच्या सुमारास आपल्या घराला कुलूप लावून मुलावर उपचार करण्याकरिता रुग्णालयात गेले होते. दोन तासांनी घरी परत आल्यानंतर समोरील दाराचे कुलूप तोडलेले दिसले. घरातील कपाटाची पाहणी केली असता कपाटामध्ये ठेवलेले सहा तोळे सोने व दीड लाख रुपये चोरीला गेल्याचे दिसून आले. याबाबत वरोरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावर श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण केले; परंतु चोरट्यांचा सुगावा लागला नाही.

सातवी चोरी

काही दिवसांपूर्वी सरदार पटेल वाॅर्ड व हेलन केलन नगरमध्ये दिवसा दोन घरे फोडून सोने व रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली. त्यानंतर शहरानजीकच्या बोर्डा गावाच्या परिसरात एकाच रात्री चार घरे फोडण्यात आली होती. या चोरट्यांचा अद्याप सुगावा लागला नाही, तर दिवसा घरफोडी करून चोरट्यांनी चांगला धुमाकूळ घातला असल्याचे दिसून येते.

Web Title: Burglary all day in Warora; Six ounces of gold and one and a half lakh lampas