वरोरा शहरात भरदिवसा घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:26 IST2021-02-14T04:26:29+5:302021-02-14T04:26:29+5:30

वरोरा : शहरात मागील काही दिवसांपासून चोरट्यांनी दिवसा घरफोड्यांचे सत्र सुरू केले आहे. शनिवारी वरोरा शहरातील एका घरात दुपारी ...

Burglary all day in Warora city | वरोरा शहरात भरदिवसा घरफोडी

वरोरा शहरात भरदिवसा घरफोडी

वरोरा : शहरात मागील काही दिवसांपासून चोरट्यांनी दिवसा घरफोड्यांचे सत्र सुरू केले आहे. शनिवारी वरोरा शहरातील एका घरात दुपारी कुणीही नसल्याचे बघत घरफोडी करून चोरट्यांनी १५ तोळे सोने लंपास केल्याची घटना घडली.

वरोरा शहरातील तुलाना रोड लगतच्या हनुमान व्यायाम शाळेजवळ राहणारे नंदू भाऊराव खेकारे हे सकाळी कुटुंबीयासह वर्धा जिल्ह्यातील आजनसरा येथे गेले होते. दुपारी ३ वाजताच्या सुमारास घरी आले असता समोरील दाराचे कुलूप तुटलेले दिसले. घरात प्रवेश करून लोखंडी कपाट बघितले असता कपाटातील १५ तोळे सोने दिसून आले नाही. याबाबत वरोरा पोलिसात तक्रार करण्यात आली. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलेश पांडे यांनी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळावर ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. यापूर्वी वरोरा शहरात चार घरफोड्या व ॲक्टिवामधील साडेतीन लाख रुपये रोख पळवून नेल्याच्या घटना घडल्या आहे. त्याचा अद्यापही वरोरा पोलिसांना सुगावा लागला नाही, हे विशेष.

Web Title: Burglary all day in Warora city