दहावी-बारावीच्या कोऱ्या उत्तरपत्रिकांचा शाळांवर बोजा; मुख्याध्यापकांचा ताप वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:29 IST2021-04-20T04:29:47+5:302021-04-20T04:29:47+5:30
चंद्रपूर : कोरोना रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे दहावी तसेच बारावीची परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार न होता पुढे ढकलण्यात आल्या ...

दहावी-बारावीच्या कोऱ्या उत्तरपत्रिकांचा शाळांवर बोजा; मुख्याध्यापकांचा ताप वाढला
चंद्रपूर : कोरोना रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे दहावी तसेच बारावीची परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार न होता पुढे ढकलण्यात आल्या आहे. मात्र, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळाने परीक्षेचे साहित्य यापूर्वीच शाळांकडे सोपविल्यामुळे ते सांभाळून ठेवण्याची जबाबदारी शाळांवर येऊन पडली आहे. मात्र, शाळा बंद असल्यामुळे मुख्याध्यापकांचा ताप आणखीच वाढला आहे.
दहावीची २३ तर १२ वीची परीक्षा २९ एप्रिलपासून घेण्यात येणार होती. यासाठी परीक्षा मंडळाने शाळांकडे नियोजित वेळापत्रानुसार कोऱ्या उत्तरपत्रिका, पुरवणी, ग्राफ, मॅप, होलोक्राॅप्ट, स्टीकर सिटिंग प्लॅन, ए, बी. लिस्ट, विषयनिहाय., माध्यमनिहाय बारकोड, प्रात्याक्षिक परीक्षेचे साहित्य आदींचा पुरवठा केला आहे. मात्र, कोरोनाचे संकट वाढल्यामुळे शिक्षणमंत्र्यांनी या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, पुढील तारखा अद्यापही निश्चित करण्यात आल्या नाही. परिणामी शाळांना पुरविण्यात आलेले साहित्य सद्य:स्थितीत शाळांकडेच आहे. हे साहित्य जोखमीचे असल्यामुळे जिल्ह्यातील मुख्याध्यापकांचा ताप वाढला आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील शाळांची स्थिती चांगली आहे. मात्र, चोरांची नजर जर या साहित्याकडे गेली तर काय होईल, या भीतीने सध्यातरी मुख्याध्यापकांची झोप उडाली आहे.
कोरोनामुळे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत शाळा बंद आहे. अशा वेळी शाळेत जाणेही मुख्याध्यापक, शिक्षकांना कठीण झाले आहे.
बाॅक्स
दहावीतील विद्यार्थी : ३५०८१
बारावीतील विद्यार्थी : २८७८९
बाॅक्स
हे साहित्य कस्टडीत
कोऱ्या उत्तरपत्रिका, पुरवणी, ग्राफ, मॅप, होलोक्राॅप, स्टीकर, सिटिंग प्लॅन, ए, बी लिस्ट, विषयनिहाय, माध्यमिक बारकोड, प्रात्याक्षिक परीक्षेचे साहित्य आदी.
बाॅक्स
परीक्षा कधी?
यापूर्वी दहावीची परीक्षा २३ एप्रिल व बारावीची परीक्षा २९ एप्रिलला जाहीर करण्यात आली होती. मात्र, कोरोना संकटामुळे शिक्षणमंत्र्यांनी या परीक्षा पुढे ढकलल्या आहे. विशेष म्हणजे, पुढे या परीक्षा कधी होणार यासंदर्भात अद्यापतरी तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.
बाॅक्स
पुढील प्रवेश कधी?
दहावी-बारावीची परीक्षा साधारणत: मार्च, एप्रिल महिन्यामध्ये होते. मात्र यावर्षी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून त्या परीक्षा सुरू करण्यात येणार होत्या. याही परीक्षा आता पुढे ढकलण्यात आल्या आहे. त्यामुळे त्या कधी होतील, याबाबत सध्यातरी संभ्रम आहे. दरम्यान, परीक्षाच झाल्या नसल्याने आता परीक्षा कधी होणार, निकाल कधी लागणार, त्यानंतर पुढील वर्गातील प्रवेश याबाबत सध्यातरी विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
बाॅक्स
अभ्यास कधीपर्यंत करायचा ?
मागील वर्षभरापासून विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण करत अभ्यास केला. आता परीक्षेच्या तारखाही जाहीर झाल्यामुळे ते सराव करत होते. आता परीक्षांची तारीख पुढे ढकलण्यात आल्यामुळे अभ्यास पुन्हा किती दिवसांपर्यंत करायचा, असा प्रश्न ते उपस्थित करत आहे.
कोट
मुख्याध्यापक म्हणतात....
दहावी-बारावीच्या परीक्षांची तारीख निश्चित झाली होती. त्यामुळे मंडळाने परीक्षेचे साहित्य शाळांकडे सोपविले आहे. मात्र, कोरोना संकटामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. त्यामुळे सदर साहित्य शाळांमध्येच आहे. संचारबंदीमुळे शाळा बंद आहे. साहित्य जपून असले तरी जिल्ह्यातील सर्वच मुख्याध्यापकांचा ताण बराच वाढला आहे.
-प्राचार्य नरेंद्र बोबडे
अध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा मुख्याध्यापक असोसिएशन